ईद मिलाद, गणेश उत्सव निमित्ताने चकलांबा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

139

🔸गणपती उत्सवात गुलाल ऐवजी फुलांचा वर्षाव करावा:- सपोनि नारायण एकशिंगे

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.17सप्टेंबर):- तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशन येथे दि. १६/९/२०२३ रोजी संध्याकाळी सात वाजता ईद मिलादुन्नबी, गणेश उत्सव, निमित्ताने शांताता समितिची बैठक आयोजित करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना सपोनि नारायण एकशिंगे म्हणाले की गणपती मूर्ती ही खूप मोठी नसावी, सोशल मीडिया चा वापर कसा करावा, जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात यावी गणपती उत्सवात कोणीही डीजे वाजवणार नाही याची दक्षता घ्यावी गणपती उत्सवात गुलाल ऐवजी फुलांचा वर्षाव केल्यास उत्तम राहील असा सामाजिक संदेश दिला आहे.

फेसबुक, वॉट्सअप, इन्स्टाग्राम, इत्यादी चा वापर योग्य करावा, कोणीहीआक्षेपहार वापर करणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, इको फ्रेंडली गणपतीचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा सार्वजनिक गणेश विसर्जन हे एकत्रित करण्यात यावा असे आवाहन सपोनि नारायण एकशिंगे यांनी केले आहे.

यावेळी कुलकर्णी साहेब, बारगजे साहेब,जायभाये साहेब, आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते तसेच माजी सरपंच गणेश खेडकर,सय्यद महेबुब कादरी,अशोक खेडकर, सतीष घाडगे, संतोष वैद्य, विष्णू खेडकर ,मधु गंडे , राहुल रोकडे,पत्रकार बांधव, गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सदस्य व प्रतिष्टीत व्यक्ती, हजर होते. सर्व प्रतिष्टीत व्यक्ती आणि समाज बांधव व युवा वर्ग उपस्थित होते. प्रस्ताविक अमोल येळे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोउपनि अंनता तांगडे यांनी मानले.