मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त भिंती पत्रकाचे विमोचन

186

✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.17सप्टेंबर):-मराठवाडा मुक्ती अमृत महोत्सवानिमित्त संत जनाबाई महाविद्यालयात गंगाखेड,येथे इतिहास विभागाच्या वतीने ‘मराठवाडा मुक्ती संग्राम’ दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेले भित्तीपत्रकाचे विमोचन डॉ.आत्माराम टेंगसे, अॅड.संतोषराव मुंडे, प्रा.डाॅ.नितीन बावळे, संत जनाबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.धूत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गंगाखेड तालुक्यातील स्वातंञ्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात दिलेले योगदानात या परिसरातील विविध आंदोलने,मोर्चे,झेंडा सत्याग्रह,वंदेमातरम सत्याग्रह चळवळ,राणी सावरगाव येथील उठाव,गंगाखेड तालुका व महाराष्ट्र परिषद,व्यायामशाळा व आखाडे इत्यादी माहितीसह मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील शिलेदार यांची माहिती या भित्तीपत्रक मध्ये दिली आहे.यासाठी विद्यार्थ्यांना प्रा.राजेश भालेराव,प्रा.अंगद कदम यांनी मार्गदर्शन केले.तर संघरक्षित तांबरे,कु.पुजा इप्पर, कु.जना शिंदे,अमन यांनी भित्तीपत्रक तयार करण्यासाठी प्रयत्न केले.