दिव्यांग बांधवांनी “दिव्यांग मित्र ॲप” डाऊनलोड करून घ्यावे – माधव शिंदे

28

✒️नांदेड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मो:-7757073260

नांदेड(दि.26जुलै):- नायगाव तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आपल्या मोबाईल मध्ये दिव्यांग मित्र ॲप डाऊनलोड करून घ्यावे. व त्यात संपूर्ण माहिती भरून द्यावे. असे आव्हान दिव्यांग वृद्ध निराधार संघटनेचे नायगाव तालुका सचिव माधव शिंदे यांनी केले आहे. त्या मध्ये संपूर्ण माहिती भरून द्यावी. १) आपला फोटो २) अपंगत्व प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक ३) आधार कार्ड ४) वयाचे प्रमाणपत्र ५) बँक पासबुक त्यामध्ये समाविष्ट करून त्वरित दिनांक ३१ जुलै २०२०पर्यंत भरून द्यावे. आपणास मिळणाऱ्या सर्व सवलतीसाठी या ॲपद्वारे नांदेड जिल्हा परिषदेने आव्हान केलेले आहे. ज्या दिव्यांग बांधवाकडे नेटचा मोबाईल नसेल. त्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथील संगणक ऑपरेटर यांच्या मार्फत विनाशुल्क ऑनलाइन करून घ्यावे. कोणासही पैसे देऊ नये काही अडचण आल्यास गटविकास अधिकारी साहेब , ग्रामसेवक साहेब यांच्याकडे तक्रार करावी. शासनाने सर्व नियम पाळावे. सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी दिव्यांग मित्र ॲप डाऊनलोड करून नोंदणी ३१जुलै २०२० पर्यंत आपली माहिती संपूर्ण द्यावी. असे आवाहन दिव्यांग वृद्ध निराधार नायगाव तालुका सचिव माधव शिंदे यांनी केले आहे.