शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.26जुुलै):-येथील हनुमान नगर येथे राहणार्‍या 94 वर्षे वय असलेल्या एका आजोबांना कोरोनाने गाठले खरे , पण कणखर आजोबांनी हिंमत न हारता जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार करून घेत कोरोनावर मात केली व बरे झाल्यानंतर स्वतः चालत रुग्णालयाबाहेर आले.
हनुमाननगर येथील रहिवासी असलेले हे आजोबा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तात्काळ येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर बरे होऊन ते स्वतःच्या घरी परतले आहेत.
 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, कोविड रुग्णालयाच्या डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी या सर्वांनी टाळ्या वाजवून या आजोबांचे अभिनंदन केले व त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपचाराच्या काळात आजोबांनी हिंमत कायम ठेवली. कोरोना योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. मास्क वापर, स्वच्छता व फिजिकल डिस्टन्सीग , या नियमांचे पालन करावे, तसेच कुठलीही लक्षणे आढळताच तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी यावेळी केले.
 

अमरावती, कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED