शाळा नाही पण शिक्षण सुरू आहे

27

संपूर्ण जगात कोराना महामारी ने थैमान घातले आहे. यात असंख्य गोष्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कित्येक लोक मृत्युमुखी पडले. प्रत्यक्ष मृत्यूपेक्षा मृत्यूच्या भयाने सर्वाधिक ग्रासले गेले.कोरोनाचा परिणाम उद्योग धंदे, अर्थव्यवस्थेवर देखील झाला. तसे शिक्षण व्यवस्था देखील कोलमडली. प्रचंड शिक्षण व्यवस्थेवर देखील याचा परिणाम झाला. चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे शिक्षणाची वाटचाल सुरू असतानाच कोरोनाच्या महामारी ने रौद्र रूप धारण केले. यामुळे शिक्षण अर्थव्यवस्था विकास यापेक्षा प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे हे सहाजिकच लक्षात घेऊन देशांमध्ये लाॅकडाउन चा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण व्यवस्था बंद करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया थांबली गेली.
शैक्षणिक सत्र 2019 -20 चा गोंधळ संपतो न संपतो तोच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात सुद्धा झाली. विदर्भात 26 जूनला शाळा उघडल्या तर उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनला शाळा उघडल्या.कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकले नसले तरी शाळा नाही पण शिक्षण सुरू आहे.
माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा घमराऀ,केंद्र चोपा, पंचायत समिती गोरेगाव, जिल्हा गोंदिया हे आहे . गावात मजुरी करणारे ,शेती करणारे पालक वर्ग आहे.ते आपल्या मुलांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्याची इच्छा नसतानाही काही करू शकत नाही. ऑनलाइन शिक्षण, दीक्षा ॲप, झूम अॅप, गुगल मीट, व्हॉट्सऍप,याप्रमाणे अनेक उपाय योजना राबवत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी आजही गावात, वाडी वस्त्या वर, स्मार्टफोन, अँड्रॉइड मोबाइल, टीव्ही, उपलब्ध नाही. पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. अनेक गावांमध्ये इंटरनेट सुविधा नाही. तरीदेखील मी स्वतः विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन, गृहपाठ देऊन, ते तपासण्याचे कार्य करीत आहे. सोशल डिस्टन्सचा नियम वापरून थेट शिक्षण मुलांच्या दारी घेऊन जाण्याचा उपक्रम मी हाती घेतला. पालकांना व विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स देऊन गटागटाने अभ्यास घेत आहे,जेणेकरून कोणाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मी स्वतः ऑफलाइन शिक्षण देत आहे.
विद्यार्थ्यांना घरचा अभ्यास, व्हाट्सअप वर आलेल्या पीडीएफ चे एक पुस्तक, प्रिंट काढून स्वतः झेरॉक्स दिल्या. वेळोवेळी सोशल डिस्टंसिंग ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या घरी जाऊन गृहपाठ तपासण्याचे काम सुरू केले. शक्य झाले तेव्हा फोनवर देखील मार्गदर्शन करते. कारण पालकां जवळ स्मार्टफोन नाही. प्रत्येक विद्यार्थी दररोज काय करतो? याची नोंद वही मी तयार करून ठेवली आहे. अशाप्रकारे शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवले आहे.
तसेच विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण, चित्रकला, गीत गायन, कविता पाठ करणे, सुविचार पाठ करणे, मातीकाम, रंगकाम, हे सुद्धा काम त्यांना दिले जाते.
याचबरोबर कोरोनाला घाबरून न जाता सोशल डिस्टन्स पाळावे, आपली वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, वेळोवेळी हात धुवावे, तोंडाला मास्क लावावे, व विनाकारण नाका -तोंडाला स्पर्श करू नये हे सुद्धा शिक्षण मुला पर्यंत मी पोहचवत आहे.
अशाप्रकारे विद्यार्थ्यांसाठी शाळा जरी बंद असली तरी शिक्षण सुरू, चालू आहे.

                              ✒️सौ.भारती दिनेश तिडके
                                         रामनगर गोंदिया
                                        मो:-8007664039