लायन्स क्लब गंगाखेड व गोल्ड सिटी तर्फे खेळाडूंना स्पोर्ट साहित्य वाटप

167

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1ऑक्टोबर):- येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे कब्बडी खेळाडूंना 17 स्पोर्ट्स, टी-शर्ट चे वाटप करण्यात आले असून या प्रसंगी लायन्स क्लबचे क्लबचे सदस्य अनंत काळे यांचा वाढदिवस ही साजरा करण्यात आला आहे.

या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये लायन्स क्लब झोन चेअरपर्सन अतुल गंजेवार,लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीधर जोशी,कोषाध्यक्ष मकरंद चिनके,उपाध्यक्ष विष्णू मुरकुटे,कॅबिनेट ऑफिसर संजय सुपेकर,कॅबिनेट ऑफिसर गोविंद रोडे,अनंत काळे,बंडू घुले,बाळासाहेब यादव,महेमुद शेख,परबत सर,मुख्याद्यापक ठुले,क्रीडा शिक्षक जयदीप फड आदी उपस्थित होते.

स्पोर्ट साहित्य वाटप प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विष्णू मुरकुटे यांनी केले तर आभार कोषाध्यक्ष मकरंद चीनके यांनी मानले.स्वच्छता पंधरवडा निमित्त गोदाकाठी स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली