राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, भारत मुक्ति मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी संघकडून महाराष्ट्र बंद चे आवाहन !

147

🔸महाराष्ट्र बंद अंतर्गत सोमवारी धरणगाव बंद व विशाल रॅलीचे आयोजन..

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.1ऑक्टोबर):-सोमवार, दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय (ओबीसी) पिछडावर्ग, छत्रपती क्रांती सेना, मौर्य क्रांती संघ, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मूलनिवासी वारकरी संघ, आदी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बंद अंतर्गत धरणगाव शहर बंद करण्याचे आवाहन केले आहे.

१. गृहमंत्री फडणवीसाच्या आदेशावरून मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या विरोधात, २. महाराष्ट्र राज्याच्या ६२ हजार सरकारी शाळांचे खाजगीकरणाच्या संविधानविरोधी व बहुजनविरोधी आर.एस.एस/भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात, ३. शिवराय – फुले- शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्र वेठ बिगारांचा महाराष्ट्र करणा-या, आर.एस.एस/भाजप सरकारच्या धोरणाविरोधात, ४. ओबीसींची जातनिहाय जणगणना करणे व संविधानिक हक्क आधिकारांच्या समर्थनात, ५. बहुजनांचे प्रेरणास्थळ पंढरपुरचे पांडुरंगाचे मंदीर बडवे ब्राम्हणाच्या स्वाधीन करण्याच्या आर.एस.एस/भाजपच्या षड्यंत्राच्या विरोधात, ६. बहुजन महापुरूषांचा, संविधान व राष्ट्रप्रतिकांचा अपमान करणा-या देशद्रोही आतंकवादी दंगलखोर मनोहर भिडेला अभय देणा-या भाजप सरकारच्या विरोधात आज महाराष्ट्रसह धरणगाव शहरात बंद पुकारण्यात आला आहे.

महाराष्ट्र बंदला जिल्ह्यासह धरणगाव शहरातील विवीध पक्ष, संघटना व संस्थांनी पाठिंबा दिला आहे. सदरील बंद शांततेत असून नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, सत्यशोधक मूलनिवासी वारकरी महासंघ, मौर्य क्रांती संघ, लहुजी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व संयोजक राजेंद्र वाघ यांनी केले आहे.