विद्यार्थी काँग्रेस श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी धीरज खेतमाळीस

26

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.28जुलै):-विद्यार्थी काँग्रेस च्या श्रीगोंदा शहराध्यक्ष पदी धिरज खेतमाळीस यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र श्रीगोंदा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. दिपक पाटील भोसले यांच्या हस्ते देण्यात आले.

प्रदेश युवक चे अध्यक्ष सत्यजीत तांबे व NSUI चे जिल्हाअध्यक्ष निखिल पापडेजा यांच्या मुळे आपणास ही संधी मिळाल्याचे खेतमाळीस यांनी सांगीतले. खेतमाळीस म्हणाले, विद्यार्थी प्रश्नासोबतच सामान्यांना न्याय देण्यासाठी शहरात विद्यार्थी काँग्रेस चा आवाज बुलंद करण्यासाठी आपण कठोर परिश्रम घेणार आहोत. विद्यार्थी व युवकांना काँग्रेस विचारधारेशी जोडण्यासाठी आपला प्रयत्न राहील.

या निवडीबद्दल खेतमाळीस यांचे राज्याचे महसुलमंत्री ना. श्री. बाळासाहेबजी थोरात साहेब, श्री. सत्यजीतदादा तांबे पाटिल, हेमंत ओगले , सौ. अनुराधा ताई नागवडे, श्री. दिपक पाटील भोसले, राजुदादा गोरे, स्मितल भैया वाबळे, आदिल शेख, योगेश मेहेत्रे आदिंनी अभिनंदन केले.