जन्मदात्या बापानेच केली चिमुकल्याची हत्या

15

🔺आरोपी पित्यास केली अटक

आरोपीने मुलाची हत्या करण्यासाठी त्याला चिखलदरा येथील गाविलगड किल्ल्याच्या परिसरात नेले. तेथे आधी मुलाचा गळा आवळला व त्यानंतर तेथेच असलेल्या नाल्यात बुडवून त्याची हत्या करुन मृतदेह जमिनीत पुरून ठेवला. हत्या केल्यानंतर घरी परतलेल्या आरोपी पित्याला घरच्यांनी मुलाबाबत विचारले असता त्याने हत्या केल्याची धक्कादायक माहीती कुटुंबीयांना दिली.

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.28जुलै):-जन्मादात्या बापानेच सहा वर्षीय चिमुकल्या मुलाची आधी गळा दाबून व नंतर पाण्यात बुडवून हत्या केली. ही धक्कादायक जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील मोझरी गावात समोर आली आहे. धर्मा शेलुकर असे हत्या झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रामदास शेलुकर याला अटक केली आहे. वडिलानेच मुलाची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.

आरोपी रामदासला तीन मुली, मुलगा व पत्नी असा परिवार आहे. आरोपीने मुलाची हत्या करण्यासाठी त्याला चिखलदरा येथील गाविलगड किल्ल्याच्या परिसरात नेले. तेथे आधी मुलाचा गळा आवळला व त्यानंतर तेथेच असलेल्या नाल्यात बुडवून त्याची हत्या केली आणि मृतदेह जमिनीत पुरून ठेवला. हत्या केल्यानंतर घरी परतलेल्या आरोपी पित्याला घरच्यांनी मुलाबाबत विचारले असता त्याने हत्या केल्याची धक्कादायक माहीती कुटुंबीयांना दिली. आरोपीच्या वडीलांनी चिखलदरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पिता रामदास शेलुकर याला अटक केली आहे.