भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच वाशीम आयोजित काव्यगंध – कविसंमेलन उत्साहात संपन्न

84

✒️पुसद प्रतिनिधी(स्वप्निल गोरे)

पुसद(दि.19ऑक्टोबर):-भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रीडम स्टोरी ऑफ इंडिया अंतर्गत संस्थेचे उपाध्यक्ष मा. विजय जायभाये यांच्या वाढदिवसानिमित्त,विद्याभारती महाविद्यालय कारंजा लाड आणि भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ रोजी,”काव्यगंध” कवी संमेलन पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दिप प्रज्वलन करून झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण म्हणून मिस इंडिया फिटनेस २०२२ च्या विजेत्या मा. सौ. विजयालक्ष्मी यादव,
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विद्याभारती कॉलेजचे प्राचार्य मा. देवरे सर, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राच्या फेवरेट कवी विजेत्या, साहित्यभूषण पुरुस्कार प्राप्त मा. अक्षशीला शिंदे (वकील,नागपूर ),भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे अमरावती प्रदेशाध्यक्ष, साहित्यिक, लेखक मा. अविनाश भिमराव ढळे, प्रमुख पाहुणे म्हणून गझलकार मा. स्वप्निल गोरे- यवतमाळ जिल्हाध्यक्ष,कवयित्री, लेखिका तथा अमरावती जिल्हा संघटक मा. सौ. शुभांगी अतकरी, लेखिका कवयित्री मा. सौ. रोहिणी गंधेवार-अकोला जिल्हाध्यक्षा, विद्याभारती महाविद्यालयातून मा. मिलिंद ब्राम्हणे सर, मा. खरड सर,
मा. अघम सर आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते.

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच वाशीम जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा कु. सेजल सस्ते, उपाध्यक्षा कु. प्रणाली चौधरी, जिल्हा कार्याध्यक्षा कु. वैष्णवी कडू आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी कवी संमेलन पार पडण्यासाठी मुख्य भूमिका बजावली.कार्यक्रमाला कारंजा विभागाचे पत्रकार मा. बंडूभाऊ इंगोले, मा. खान सर, मा. सुधीर देशपांडे सर यांनी कार्यक्रमाला येऊन भेट दिली. सदर कार्यक्रमात एकूण ३० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी विविध विषयांवर कविता सादर करून रासिंकांचे मने जिंकली.याचबरोबर विद्याभारती क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरण मा. खरड सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

कवी संमेलनात उपस्थित मान्यवरांनी कविता , गझल , चारोळी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.मा. अविनाश ढळे यांनी संस्थेची ओळख करून देत नवोदित कवींना मार्गदर्शन केले आणि कविता सादर केली, मा. स्वप्नील गोरे यांनी “केसाने कापला गळा” हि भन्नाट कविता सादर करून रसिकांची दाद मिळविली.कार्यक्रमाला लाभलेल्या मा. विजयालक्ष्मी यादव यांनी आपला बालपणाचा अनुभव सांगून विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला, सोबतच विद्याभारती कॉलेजचे मा. नांदगावकर सरांनी सुंदर कविता सादर करून सर्वांची दाद मिळविली.

प्रमुख अतिथी मा. अक्षशिला शिंदे यांनी सर्व नवोदित कवींना कवितेसाठी मार्गदर्शन करत आजच्या तरुणाई च्या वाढत्या मोबाईल वापरावर प्रकाश टाकत सर्वांशी संवाद साधला.कार्यक्रमाशेवटी विद्याभारती महाविद्यालयातर्फे सर्व निमंत्रित पाहुणे, अतिथी, यांना कवी संमेलनाची आठवण म्हणून ” डॉ. सुभाष सावरकर लिखित जनसाहित्य चळवळ हे पुस्तक भेट देण्यात आले.

कु. प्राजक्ता इंगोले- सचिव, कु. शर्वरी राजुस्कर -उपसचिव यांनी कार्य्क्रमाच्या सुत्रासंचालनाची धुरा सांभाळत, चारोळ्या, शेर, ब्रीदवाक्य यांच्या अलंकाराने वातावरण प्रफुल्लीत केले.कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी तसेच प्राध्यापक, कर्मचारी आणि आमंत्रित कवी उपस्थित होते.