ब्रम्हपुरीतील न. प. अतिक्रमण धारकांना नमुना आठवर घरकुल द्या

27

🔹बहुजन रिपब्लिकन सोशियालिस्त पार्टीने केले निवेदन सादर

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी (दि.२८ जुलै):- बहुजन रिपब्लिकन सोशियालिस्त पार्टी ब्रम्हपुरी, यांच्या वतीने मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले.ब्रम्हपुरी तील हनुमान नगर वार्ड न. ५ मध्ये तिन्ही ऋतू मध्ये पाण्याच्या समस्येला सामोर जावं लागत आहे. या वार्डातील लोकांनी न. प. शासनाला वारंवार पाण्याच्या समस्येबद्दल सूचना देऊन सुध्दा या समस्या कडे दुर्लक्ष केले आहे. या समस्या कडे काळजीपूर्वक लक्ष्य देऊन ही समस्या दूर करावी असे, बी. आर. एस. पी. च्या कार्यकर्त्यांनी निवेदनात म्हटल आहे. तसेच ब्रम्हपूरी न. प. अतिक्रमण धारकांना गाव नमुना आठ वर घरकुल योजना देण्यात यावी, व घरकुल ला प्रती निधी पाच लाख देण्यात यावी. तसेच अनु. जाती , जमातीतील येणारा फंड त्यांच्या करिता वापरण्यात यावा व दलीत वस्तीला येणारा फंड त्याच वस्तीत वापरण्यात यावा. या सर्व समस्या कडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात यावे अन्यथा बी. आर. एस. पी. ब्रम्हपुरी च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.  निवेदन देते वेळेस ब्रम्हपुरीचे बी. आर. एस. पी. चे तालुका अध्यक्ष प्रभूजी लोखंडे, तालुका महासचिव राजेंद्र मेश्राम, तालुका उपाध्यक्ष आनंदराव मेश्राम, आणि इतर कार्यकर्ता संजय मेश्राम, मोतीलाल देशमुख हे उपस्थित होते.