पारमिता बुध्दविहार येथील वर्षावासाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न

    118

    ✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

    पुसद(दि.31ऑक्टोबर):-दि बुध्दिष्ट सोसायटी आँफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शहर शाखा व तालुका शाखा आणि पारमिता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावासाचे आयोजन पारमिता बुध्दविहार महाविरनगर येथे करण्यात आले होते. त्याचा समारोपीय कार्यक्रम दि.३० ऑक्टोंबर २०२३ रोजी करण्यात आला.

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड धम्मभूषण आप्पाराव मैंद, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धम्मभूषण अर्जुनराव लोखंडे, विश्वदीप महाबोधी बुद्धविहार अध्यक्ष धम्मभूषण साहेबराव गुजर,तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. सदस्य भोलानाथ कांबळे, प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव भगवान बरडे, ग्रंथवाचक भगवान खंदारे हे मान्यंवर उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

    गोपाळबाबा वलंगकर राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड. आप्पाराव मैंद, सामाजिक कार्यकर्ते अर्जुनराव लोखंडे, साहेबराव गुजर , तसेच
    आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करणारे भगवान खंदारे यांचा पुष्पगुच्छ, शाल, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान बरडे यांनी केले. सूत्रसंचालन ल.पु. कांबळे यांनी केले तर आभार प्रल्हाद खडसे यांनी मानले.यावेळी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा ,तालुका शाखा ,महिला वार्ड शाखा,पारमिता महिला मंडळाच्या पदाधिकारी, उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.