” अभ्यास करताना मनाची एकाग्रता आवश्यक ” – प्रा.अरुण बुंदेले

293

🔹” श्रीमती जानकीबाई देशमुख माध्य.व उच्च माध्य.कन्या शाळेत प्रा.अरुण बुंदेलेंची आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला संपन्न.”

✒️अचलपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अचलपूर(दि.31ऑक्टोबर)” विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना न्यूनगंडाची भावना मनातून काढून आत्मविश्वास जागवावा.मन वाचन,मौन वाचन,नेत्र वाचन,चित्र वाचन या वाचनाच्या प्रकारानुसार वाचन केल्यास वाचन केलेल्या प्रश्नांची उत्तरे दीर्घकाळ लक्षात राहतात. अर्थ समजल्याशिवाय पाठांतर करू नये.अभ्यासाचे 24 तासाचे वेळापत्रक तयार करूनच अभ्यास करावा म्हणजे वेळ व्यर्थ जाणार नाही.दिवसभर केलेल्या अभ्यासाचे अभ्यासानंतर चिंतन मनन करावे न आठवल्यास पुन्हा अभ्यास करून त्याचा सराव करावा.अभ्यास करताना मनाची एकाग्रता आवश्यक आहे .सर्व विषयांकडे समान लक्ष देऊन अभ्यास केल्यास विद्यार्थी उत्तम गुणाचे धनी बनू शकतात,असे विचार प्रमुख मार्गदर्शक – विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी व्यक्त केले.

ते हायस्कूल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती जानकीबाई देशमुख माध्य.व उच्च माध्य.कन्या शाळा, अचलपूर,जि.अमरावती येथे दि.२८ ऑक्टोबर २०२३ ला स्वनिर्मित “आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला ” या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
” आदर्श विद्यार्थी प्रबोधन माले “च्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ.उषा प्रमोद जोशी तर प्रमुख मार्गदर्शक ” आदर्श अभ्यासाचे तंत्र ” या पुस्तकाचे लेखक प्रा.अरुण बुदेले,प्रमुख अतिथी प्रभारी पर्यवेक्षक सौ. संगीता प्र.तुरखडे , प्रभारी पर्यवेक्षक श्री श्रीकांत श्री . पसारकर होते.

” प्रा.बुंदेलेंची विद्यार्थी प्रबोधन माला प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक “
– प्राचार्य सौ.उषा जोशी

प्रबोधन मालेच्या अध्यक्षा प्राचार्य सौ.उषा प्रमोद जोशी या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की , ” प्रा.अरुण बुंदेले सरांनी विद्यार्थ्यांना जे अभ्यास विषयक मार्गदर्शन केले ते अनमोल आहे. त्याचे आचरण विद्यार्थ्यांनी केल्यास ते गुणवंत बनू शकतात. कारण अभ्यास कसा करावा ? या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर विद्यार्थ्यांना या प्रबोधन मालेतून मिळाले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ही “आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला” पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

” विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करणारी प्रा.बुंदेले यांची विद्यार्थी प्रबोधन माला.”
– सौ.संगीता तुरखडे

प्रमुख अतिथी प्रभारी पर्यवेक्षक सौ.संगीता प्र.तुरखडे यांनी,” प्रा.अरुण बुंदेले सरांनी विद्यार्थ्यांना केलेले अभ्यास विषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण निर्माण होऊन प्रत्येक विषयात उत्तम गुण मिळवू शकतात. ” आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला ” या त्यांच्या कार्यक्रमाच्या नावातच प्रबोधन मालेचा खरा अर्थ दडलेला आहे कारण ” अभ्यास करणे ” हा विद्यार्थ्यांचा विद्यार्थी धर्म जागृत करणारी ही प्रबोधन माला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.”
विद्यार्थी प्रबोधन मालेचे संचालन श्री अमित र.भगत तर आभार सौ.अंजली राजेंद्र नागपूरे यांनी मानले .

विद्यार्थी प्रबोधन माले मध्ये श्री प्रवीणकुमार ज्ञा.मोंढे, सौ.जयश्री स.पाटील,श्री राहुल ज्ञा.ढाकूलकर,सौ.पल्लवी नि. गणोरकर,श्री सुशील श्या. गौर, श्री अनिरुद्ध रा.गोरे,सौ.सुवर्णा सुनिल देशपांडे, सौ.कमल सु. बावने,सौ.देवयानी सु.जोशी, सौ.दीपावली अतुल मदने,श्री योगेश मु.प्रधान, कु.नम्रता नं.ठाकूर,सौ.अमृता दिनानाथ पाठक,कु.पूजा प्र.जावळे, कु. सोनाली नि.कलोती यांची उपस्थिती होती.