कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर..महिलेची प्रसुती झाली घरी

    565

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

    गडचिरोली(दि.31ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागील अनेक दिवसांपासून आपल्या न्याय हक्क मिळवून घेण्यासाठी संप सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह , उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र ओस पडले आहेत. शासन सेवेत कायम असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच कामकाजाची धुरा कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपविली होती.. परंतु कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप असल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे.

    अशा स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र पोरला अंतर्गत येणाऱ्या आणि कनेरी उपकेंद्राच्या देखरेखीखाली येणाऱ्या पुलखल येथील एका महिलेची प्रसुती घरीच करावी लागली. यावरून शासन सेवेत नियमित असलेले कर्मचारी किती कर्तव्यदक्ष आहेत याची प्रचिती येते. सद्यास्थितीत आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक सुध्दा आपल्या अनेक मागण्या शासनाने मान्य कराव्या या मागणीसाठी संप करित आहेत.

    गडचिरोली पासून अगदी जवळच असलेल्या पुलखल येथील महिलेची प्रसुती घरिच करावी लागली असल्याने शासन सेवेत आरोग्य सेवा देणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पुलखल येथील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रोष व्यक्त केला आहे. याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय कासलाऀवार आणि संबंधित वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.