श्री धुंडेश्वरी नवरात्र महोत्सव निमित्त कोजागिरी पौर्णिमा केली साजरी

58

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.31ऑक्टोबर):-श्री धुंडेश्वरी नवरात्र महोत्सव निमित्त कोजागिरी पौर्णिमा गंगाखेड मध्ये साजरी करताना धुंडेश्वरी मित्र मंडळाचे मुख्यप्रवर्तक श्रीधराचार्य जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रमुख उपस्थित कार्यक्रमांमध्ये धुंडेश्वरी मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ.समीर गळाकाटू,उपाध्यक्ष-अभिजीत चौधरी,सचिव-अमोल ओझरकर, मार्गदर्शक-माधवाचार्य अयाचित, गजानन जोशी,नागेश बोरीकर, यांची उपस्थिती होती.

कोजागिरी पौर्णिमा कार्यक्रमाच्या सुरुवातीला चारी वेदाचे मंत्र जागरण करून देवीला दूध तांदळाची नैवेद्य दाखवून कोजागिरी वंदन करण्यात आल्यानंतर दुपारी देवीची पूजा करून भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला लागलीच फटाक्याच्याआतीषबाजीनी सायंकाळी महाआरती ही करण्यात अली.

याप्रसंगी कोजागिरी पौर्णिमेची सांगता महागायक यज्ञेश्वर लिंबेकर यांच्या सुगम संगीताने करण्यात आली.यावेळी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देविदास गळाकाटू,प्रदीप चौधरी दीपक मार्कट,अजिवस कुलकर्णी,कृष्णा पैठणकर, अभिनवआचार्य अयाचित, शंकर भरणे,दीपक जोशी,शुभम जोशी,आदित्य कुलकर्णी,प्रथमेश कुलकर्णी,ओंकार महाजन,अथर्व खळीकर,राघवेंद्र खळीकर,भारत गव्हाणे,रवी देशपांडे,नागेश धामणगावकर,बाळासाहेब धुरे इत्यादींनी परिश्रम घेतले.