आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड येथे भांगडीया फाउंडेशन तर्फे आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळा संपन्न

327

✒️संजय बागडे(प्रतिनिधी नागभीड)मो:-9689865954

नागभीड(दि.5नोव्हेंबर):-आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे भांगडीया फाउंडेशन तर्फे आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. यावेळी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित तालुक्यातील समस्त भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि सर्व कार्यकर्त्यांचे औक्षण करत शुभेच्छारुपी भेटवस्तू व फराळाचे वितरण केले.

यावेळी मंचावर भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजयभाऊ गजपुरे, माजी सरपंच व भाजपा नेता जहाँ गिर भाई कुरेशी,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा ज्येष्ठ नेते मोरेश्वरजी ठिकरे, माजी प्रथम नगराध्यक्ष न.प. नागभीड प्रा. उमाजी हिरे सर, नागभीड कृ.उ.बा. समिती अवेश पठान,उपसभापती रमेश बोरकर, नागभीड कृ.उ.बा. समिती संचालक , नगर परिषद माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा इंदुताई आंबोरकर, माजी भाजपा तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, ईश्वर मेश्राम, विलास दोनाडे, डॉ. मदन अवघडे, आनंद कोरे, बंडू गेडाम, धनराज बावनकर, सुखदेव भाकरे, हरिभाऊ गरफडे तालुक्यातील भाजपा बुथ प्रमुख बहुंस्खेनी पुरुष व महिला हजारो च्या उपस्थित होते.