मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या मि.फेमस ब्रँड आऊटलेटचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील नऱ्हे येथे ग्रँड ओपनिंग समारंभ संपन्न

69

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.5नोव्हेंबर):-मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक स्वरूप सावंत यांच्या मि.फेमस ब्रँड आऊटलेटचे नुकतेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रँड ओपनिंग समारंभाचे आयोजन करण्यात आले. या मिस्टर फेमस ब्रँडच्या पहिल्या आउटलेटचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ पुण्यातील उद्योजक कौशिक मेहता, पाटलांचा बैलगाडा फेम अभिनेते प्रकाश धिंडले, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मिस्टर फेमस ब्रँड चे संचालक स्वरूप सावंत, चित्रपट निर्माते सागर जैन,निर्माते वृषभ कोठारी, मेकअप आर्टिस्ट सुमय्या पठाण, मॉडेल राज चामरे,सामाजिक कार्यकर्त्या चेतना बिडवे,अभिनेते आनंद सरोदे,डॉ. प्रशांत शेरेकर, बालकलाकार अनन्या टेकावडे,बाळासाहेब सावंत ,वैशाली सावंत,ध्रुव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले म्हणाले की कला क्षेत्र हे मुळातच अनिश्चित असते त्यामुळे अशा क्षेत्रातील व्यक्तींनी व्यवसाय सुरू केले तर त्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट होईल.

या मिस्टर फेमस ब्रँड मध्ये पुरुषांसाठी विविध प्रकारचे कॅज्युअल शर्ट व पॅन्ट उपलब्ध असणार आहे. मिस्टर फेमस ब्रँड चे संचालक स्वरूप सावंत यांनी पुण्यामध्ये दर्जेदार ब्रँड आणला असून लवकरच महाराष्ट्रामध्ये विविध आउटलेट सुरु करणार आहेत.मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी आत्तापर्यंत पॉस्को 307,बॅलन्स,भानावर जिंदगी,रंभ हे मराठी चित्रपट दिग्दर्शित केले असून त्यांनी आता कपड्याच्या व्यवसायात पदार्पण केले आहे.तसेच दिवाळी पर्यंत पुरुष ग्राहकांसाठी मिस्टर फेमस ब्रँडच्या खरेदीवर विशेष डिस्काउंट दिला जाणार आहे.तरी एकदा पुरुष ग्राहकांनी आपल्या शर्ट व पँट खरेदी करण्यासाठी नक्कीच पुण्यातील नऱ्हे येथील नवले हॉस्पिटल शेजारच्या आउटलेट ला नक्की भेट द्या.