डिपफेक व्हिडीओ पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

128

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

धुळे(दि.8नोव्हेंबर):- सध्या टेक्नालॉजी ही फार अत्याधुनिक झाली आहे त्याचा फायदा गुन्हेगार घेत असतात. असाच एक प्रकार म्हणजे डिपफेक व्हिीडीओ. नेमके यात आपल्याला प्रश्न पडला असेल की डिपफेक व्हिीडीओ म्हणजे नेमके काय? डिफ्फेक व्हिडीओ टेक्नॉलाजी म्हणजे आपले हुबेहुब व तंतोतंत असे बारीक सारीक डुप्लीकेट एक चुकीच्या पध्दतीने बनवलेले गेलेले व्हिडीओ याला बघून आपल्याला असे वाटेल की हा आपलाच व्हिडीओ आहे का नाही, आपल्याला ते समजणार सुध्दा नाही अशा पध्दतीने टेक्नॉलॉजीचा गैरवापर करुन हा डिपफेक व्हिीडीओ बनवला जातो. या डिपफेक व्हिीडीओ पध्दतीचे अनेक नागरीक बळी पडत आहे.

सदरील प्रसंग हा आपल्यावर देखील होवू शकतो म्हणून नागरीकांनी आपले फेसबुक इन्स्टाग्राम अकौंट लॉक करावे व सोशल मिडीयावर फोटो टाकताना सदरील फोटोला देखील लॉक करावे किंवा त्या बाबतीत गोपनियता बाळगावी. अज्ञात व्यक्तींना आपण सोशल मिडीयावर कधीही पाहिलेले नसतांना देखील आपण त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो व त्यांच्याशी आपण संवाद सुरु करतो हे देखील करणे आपल्याला कधी महागात पडू शकेल हे सांगता येत नाही.

तसेच आपण आपल्या सुरक्षेसाठी आपले नाव गुगलेवर सर्च करावे आणि जर आपले फोटो किंवा व्हिडीओ कोणतीही वेबसाईट चुकीच्या पध्दतीने त्यांचा गैरवापर करीत असेल तर त्याची दखल घ्यावी व आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.