गंगाखेड तालुका डोंगर भागासह कोरडा दुष्काळ जाहीर करावा डोंगरी जनपरिषदेच्या वतीने तहसीलदार यांना दिले निवेदन

54

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8नोव्हेंबर):- तालुक्यातील डोंगर भागासह संपूर्ण तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीचे निवेदन डोंगर भागातील शेतकऱ्यांनी डोंगरी जनपरिषदेच्या वतीने तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना आज दिनांक 8 11 2023 रोजी देण्यात आले. गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागासह संपूर्ण तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन डोंगरी जनपरिषदेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना गंगाखेड तहसीलदारांमार्फत देण्यात आले असून डोंगर भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात यावे.

डोंगर भागामध्ये भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील डोंगर भागामध्ये अत्या अल्प प्रमाणात पाऊस झाला असून खरीपाची सर्व पिके करपून गेली असून शेतकऱ्यांना कुटुंब जगविने मुश्किल झाले असून जगावे की मरावे असे वाटत असून डोंगर भागासह संपूर्ण तालुका शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करावा जर डोंगर भागास संपूर्ण तालुका कोरडा दुष्काळ जाहीर नाही केल्यास डोंगरी जनपरिषदेच्या वतीने डोंगर भागातील शेतकरी डोंगरी भागात असणाऱ्या मोजे डोंगरगाव या गावच्या शिवारातील पाण्या वाचून कोरड्या पडलेल्या पाझर तलावामध्ये दिनांक 29 11 2023 रोजी आक्रोश धरणे आंदोलन करणार असल्याचे या निवेदनामध्ये शासनाला कळवले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या नंबर 1. डोंगर भागासह संपूर्ण तालुका कोरडा दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा 2. डोंगर भागातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये दुष्काळी अनुदान देण्यात यावे 3. डोंगर भागात जनावरासाठी चारा व पाण्याच्या छावण्या तात्काळ उभ्या करण्यात याव्यात 4. डोंगर भागातील प्रत्येक गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा 5. डोंगर भागातील गावांमध्ये रोजगार हमीची कामे सुरू करण्यात यावेत 6. डोंगर भागातील गावांमध्ये भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गावठाण फिडरचा विद्युत पुरवठा वसुलीच्या नावाखाली तोडण्यात येऊ नये असे आदेश महावितरण कंपनीला देण्यात यावेत वरील मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात अन्यथा दिनांक 29 11 2023 रोजी डोंगरी जनपरिषदेच्या वतीने मोजे डोंगरगाव येथील शेत शिवारातील पाझर तलावात डोंगर भागातील शेतकरी आक्रोश आंदोलन करणार असल्याचे निवेदनाद्वारे प्रशासनास कळवले आहे.

निवेदन देते वेळेस डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे संयोजक आश्रुबा दतराव सोडगीर पंडित निवृत्ती सोडगीर दादासाहेब खांडेकर बालासाहेब किसनराव मुंडे बालासाहेब सोडगीर शंकर अण्णा रुपनर केशव भेंडेकर ज्ञानोबा फड ज्ञानोबा मारोतराव हक्के जगन्नाथ मुंडे दत्तराव आईनीले विनायक धोंडीबा दहिफळे अनिल परकड दत्ता तिडके रतन सिंग सिसोदे मधुकर सिसोदे शेषेराव सिसोदे हनुमान पंडित मुंजाजी तिडके साहेबराव पंडित हरिभाऊ राठोड मारुती चव्हाण बालाजी ईमडे कोंडीबा सिसोदे ज्ञानोबा नागरगोजे भरत सिसोदे बाबुराव नागरगोजे आदी असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.