बल्लारपूर कार्यकारी अभियंता कार्यालयापुढे वीजबिलाची होळी

  86

  🔸”बिजली हमारी भाव सरकारी,नही चलेगा नही चलेगा ” घोषणेने दुमदुमले वीज अभियंता कार्यालय

   ✒️बल्लारपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क

  बल्लारपूर(दि.29जूलै):-भूमी,कोळसा,पाणी आमचे विदर्भाचे असतांना आम्हाला मात्र प्रदूषणाचा सामना करुनही भरमसाठ वीजबिले वीज वितरण कंपनी कडून पाठविण्यात आली आहेत. याचा निषेध करीत लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे व पुढे विदर्भातील जनतेला दोनशे युनिट वीज मोफत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी आज दिनांक २८ जुलै, रोज मंगळवारला बल्लारपूर येथील जुने पॉवर हाऊस येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयापुढे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वीज बिले जाळून निषेध नोंदविला. या ” वीज बिल जलाओ ” आंदोलनात मोठ्या संख्येने नागरीक व महिला सहभागी झाल्या.
  दिनांक २८ जुलैला दुपारी बारा वाजता वीज मंडळाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन समितीच्या शेकडो कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी जोरदार घोषणा देत वीज बील जाळून आपला संताप व्यक्त केला. समितीच्या शिष्टमंडळाने सहा मागण्यांचे निवेदन मा.मुख्यमंत्री व मा.उर्जामंत्री यांना पाठविण्यासाठी वीज अभियंता यांना दिले.
  या आंदोलनाचे नेतृत्व समितीचे नेते माजी आमदार अँड.वामनराव चटप, मितीन भागवत, जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार,गिरीधरसिंह बैस, किशोर दहेकर,अंकुश वाघमारे,कवडू पोटे,कपील ईद्दे,नथमल सोनी,पंढरी बोंडे,रमेश नळे,बंडू माणुसमारे,शेषराव बोंडे,हरीदास बोरकुटे,सूरज जीवने,दिवाकर माणूसमारे, कवडू बुटले,मधुकर चिंचोलकर,भारती बोबडे, रंजीता दुर्योधन,तनुजा वाळके,वंदना गेडाम यांनी केले. या आंदोलनात सौरभ गिरसावळे,संदीप पोडे,चेतन भोयर,सुविधा बांबोडे,इंदू डोंगरे,कल्पना अलोणे, बेबीनंदा शेंडे,भाग्यश्री तिरपूडे,चेतन पाल,संदीप पोडे,दत्ता हिंगाणे,हसन रिझवी,हरीश्चंद्र आवारी,पंढरी घटे,गोविंद कडूकर,मंगेश मोरे,शिवाजी सातपूते,देवराव बोबडे,संदीप पाटील सुरज गावंडे, राजू काळे इ.सह बल्लारपूर व पोंभुर्णा तालुक्यातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
  लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावे,दोनशे युनिट वीज मोफत द्यावी, घरगुती, व्यावसायिक व औद्योगीक वापरातील वीज बिलाचे दर निम्मे करावे,विज पंपाचे थकीत बिल माफ करावे यासह अनेक मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्याचे पोंभूर्णा येथील समितीचे जेष्ठ नेते गिरीधरसिंह बैस यांनी सांगीतले.