गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे संविधान दिन साजरा

    185

     

     

    रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986

    ब्रम्हपुरी:- 26 नोव्हेंबर रोजी देशभरात संविधान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय लोकांसाठी खूप खास आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व कळावे, संविधानाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने स्थानिक गंगाबाई तलमले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरीचे अध्यक्ष प्रा.डॉ. राकेश तलमले उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाऊराव राऊत उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. लालाजी मैंद, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. संतोष पिलारे, प्रा. माधव चूटे, प्रा. तलमले, श्री. उमेश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
    यावेळी कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून उपस्थित भाऊराव राऊत यांनी आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनीं यावेळी सांगितले. संस्था अध्यक्ष प्रा.डॉ. राकेश तलमले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय संविधानाचे महत्व समजावून सांगताना म्हणाले की, एक सुरक्षित, न्यायपूर्ण आणि सामाजिक रूपांतराणसाठी समर्थ भारत तयार करण्यात संविधानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. संविधानाने नागरिकांना मौल्यवान अधिकारे प्रदान केली आहेत. असे विचार व्यक्त केले.
    यावेळी सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संविधान उद्दिश्यकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष पिलारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हर्षय नाकतोडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.