ने. हि. कन्या विदयालय ब्रम्हपूरी येथे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जनजागृती कार्यक्रम

    197

     

    रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986

    ब्रम्हपुरी:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई व माननीय जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या निर्देशान्वये वार्षिक किमान समान कार्यक्रम पत्रिकेनुसार दिलेल्या कार्यक्रमा अंतर्गत Constitution Day (26th November), 2) Cyber Crime, 3) Drug Abuse, 4) ADR methods and benefits, 5) Fundamental Duties of the Citizens या विषयांवर जनजागृती कार्यक्रम नेवजाबाई हितकारीणी कन्या विदयालय, ब्रम्हपूरी येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. श्री एस. डी. चक्कर, अध्यक्ष, तालुका विधि सेवा समिती, ब्रम्हपुरी तथा दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, ब्रम्हपुरी हे उपस्थित होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून मा. श्री. डी. बी. गुट्टे साहेब, सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, ब्रम्हपुरी, प्रमुख अतिथी म्हणून सौ पि. व्ही. बनपुरकर, मुख्याध्यापिका व श्री भैय्या सर, उपमुख्याध्यापक, नेवजाबाई हितकारीणी कन्या विदयालय, ब्रम्हपूरी हे उपस्थीत होते. कार्यक्रमास अधिवक्ता श्री एच. एस. उरकुडे, अध्यक्ष बार असोशिएन, ब्रम्हपुरी हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास अॅड. कु. भृती नागपुरे, अॅड. नंदेश्री अवताडे, अॅड. ए. एस. गोंडाणे व अॅड. श्री. ए. टी. खोब्रागडे, पोलिस उप निरीक्षक श्री निशांत जुनोनकर तसेच नेवजाबाई हितकारीणी कन्या विदयालय, ब्रम्हपूरीच्या विदयार्थीनी, शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    या कार्यक्रमात अॅड. ए. टी. खोब्रागडे यांनी Constitution Day व Fundamental Duties of the Citizens या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. अॅड. नंदेश्री अवताडे यांनी Cyber Security या विषयावर मार्गदर्शन केले, अॅड. श्री. एच. एस. उरकुडे यांनी Drug Abuse या विषयावर, पोलिस उप निरीक्षक श्री निशांत जुनोनकर यांनी Cyber Crime या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तर अॅड. कु श्रृती नागपुरे यांनी ADR methods and benefits या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. डी. बी. गुट्टे साहेब, सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, ब्रम्हपुरी यांनी अध्यक्षीय भाषण केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विजय निखारे, शिक्षक नेवजाबाई हितकारीणी कन्या
    विदयालय, ब्रम्हपुरी यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. श्री. ए. टी. खोब्रागडे यांनी केले व आभार प्रदर्शन अॅड. ए. एस. गोडांणे यांनी केले. या कार्यक्रमाला सुमारे 32 पुरुष व 16 महिला, असे एकुण 48 जन उपस्थित होते.