पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मूल नगरीत ३ डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी

178

 

साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे . या संमेलनाच्या बोधचिन्हाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे व स्वागताध्यक्ष प्रा . रत्नमालाताई भोयर यांचे हस्ते योग भवन मूल येथे करण्यात आले .
यावेळी झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे सचिव लक्ष्मण खोब्रागडे , झाडीबोली साहित्य मंडळ मूल शाखेचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य सुखदेव चौथाले , सचिव वृंदा पगडपल्लीवार उपस्थित होत्या . सदर बोधचिन्ह कवी व ग्राफिक्सकार रामकृष्ण चनकापुरे यांनी डिझाइन केले असून त्याबद्दल झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर , ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , सुनील बावणे , प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे , वर्षा भांडारवार , गणेश मांडवकर , विजय लाडेकर , नामदेव पीजदूरकर , परमानंद जेंगठे , पंडित लोंढे , प्रशांत भंडारे , सुनील पोटे , सुरेश डांगे , संतोष मेश्राम , मंगला गोंगले अभिनंदन केले .