दुःख निर्मितीस कारण ठरू नये, म्हणून सम्यक वाणीचा अवलंब करावा- धम्मसंगिती

63

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

 

पुसद- मानवी जीवन सुखी व्हावे म्हणून मानवानी वाणीचा उपयोग तोलूनमापून करावा.दुःख निर्मितीस आपली वाणी कारण ठरू नये याची खबरदारी घ्यावी.म्हणजेच मानवानी सम्यक वाणीचा अवलंब करून जग सुखी करण्यास हातभार लावावा असे मत चार्वाकवनात आयोजित कार्तिक पौर्णिमा धम्मसंगितीत व्यक्त झाले.

वाणी ही धनुष्यबाणाप्रमाणे असते. बाण एकदा कमानीतून सुटला की,तो परत घेता येत नाही,तसेच तोंडातून निघालेला शद्ब मागे घेता नाही.म्हणून कोणताही शद्ब उच्चारणापूर्वी शंभरवेळा त्याच्या परिणामाचा विचार करावा आणि तो शद्ब उच्चारावा.त्यामुळे वाणी दुःख निर्मितीस कारण होणार नाही,असा चर्चेचा आशय होता.
से.नि.जिल्हाधिकारी मनोहरराव भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्तिक पौर्णिमा धम्मसंगितीत सर्व उपा. उत्तमलाल रामधनी, चंद्रकांत आठवले, व्हि.एस.जोहरे,संजय आसोले, राजाभाऊ राऊत, पी, बी. भगत, टी,बी.कानिंदे,अॕड.अप्पाराव मैन्द,प्रदीप तायडे आणि विश्वजीत भगत हजर होते.

सकाळी ९ वाजता धो धो पाऊस चालू होता, म्हणून शेड मधील बुद्धमूर्तीपूढे वंदना घेण्यात आली.उपा.पी.बी.भगत यांनी कार्तिक पौर्णिमेचे बौद्धधम्मातील महत्व विशद केल्यानतर ‘सम्यक वाणी’ या विषयावर चर्चा झाली. धम्मसंगितीचे अध्यक्ष मनोहरराव भगत यांनी समारोप केल्यानंतर, उपस्थिताचे आभार, संजय असोले यांनी मानले आणि धम्मसंगितीची सांगता झाली.