पहिल्या महिला साहित्य संमेलनात घडणार विविध कलाकृतीचे दर्शन ग्रंथदिंडी, वेशभूषा, रांगोळी, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, परिसंवाद व कवीसंमेलनाचा अद्भुत सोहळा

    133

     

    सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी मो. 8605592830

    चंद्रपूर- झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर आणि झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मुल यांच्या वतीने पहिल्यांदाच पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन राष्ट्रमाता जिजाऊ नगरी बालविकास प्राथमिक शाळा मुल येथे रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 ला आयोजित केलेले असून , संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे व स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर यांचे उपस्थितीत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर यांचे हस्ते उद्घाटन,प्रा. रत्नमाला ताई भोयर यांचा प्रातिनिधीक कवितासंग्रह हीरदयातील खपली व सुनिता बुटे यांच्या मनभावना कवितासंग्रहाचे प्रकाशन तसेच झाडीबोली महिलारत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे .
    या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे नवभारत विद्यालयपासून गांधी चौक ते बालविकास प्राथमिक शाळेपर्यंत निघणाऱ्या ग्रंथदिंडीत लोककला व लोकपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या वेशभूषा, लेझीम, बँडपथक , कवायती आणि वैशिष्ट्यपूर्ण झाकी प्रदर्शित करण्यासाठी मूल नगरीतील शिक्षक , सर्व कर्मचारी व विद्यार्थी आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. झाडी गौरवासाठी शाहीर नंदकिशोर मसराम व गायिका विद्या कोसे यांच्या स्वरांची जुगलबंदी रंगणार आहे. रस्त्यांच्या दुतर्फा साहित्य नगरीत आकर्षक रांगोळ्याची आरास असेल.
    दुसऱ्या टप्प्यात लोकगीते आणि स्त्री साहित्य यावर प्रकाश टाकण्यासाठी अकोल्याच्या ज्येष्ठ साहित्य डॉ. प्रतिमाताई इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. विशाखा कांबळे नागपूर , डॉ. कल्पना नरांजे नागपूर व रणरागिनी मंचाच्या अध्यक्षा संगीता बढे वर्धा यांचा परिसंवाद आयोजित केलेला आहे. तिसऱ्या टप्प्यात झाडीची बहिणाबाई ज्येष्ठ साहित्यिक अंजनाबाई खुणे वडेगाव यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन रंगणार असून त्यात राज्यभरातील अनेक कवयित्रींचा सहभाग असणार आहे . याच साहित्य संमेलनात झाडीपट्टीतील साहित्यिकांचा व झाडीबोलीच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात येणार आहेत .
    तरी मूल नगरीत होऊ घातलेल्या वैविध्यपूर्ण महिला साहित्य संमेलनात राज्यभरातील सर्व साहित्यिक व साहित्य रसिकांनी , नागरिकांनी सहभागी व्हावे , असे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर , ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सचिव लक्ष्मण खोब्रागडे , मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले , वृंदा पगडपल्लीवार , सुनील बावणे , प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे , वर्षा भांडारकर , सुनीता बूटे , गणेश मांडवकर , विजय लाडेकर , नामदेव पीजदूरकर , परमानंद जेंगठे , पंडित लोंढे , प्रशांत भंडारे , रामकृष्ण चनकापुरे , सुनील पोटे, सुरेश डांगे, संतोष मेश्राम, मंगला गोंगले यांनी मूल येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत केले .
    —————————————-

    झाडीबोली साहित्य मंडळाच्या चळवळीत महत्त्वपूर्ण सहभाग घेऊन मंडळाच्या वतीने साहित्य प्रकाशित केल्याबद्दल या साहित्य संमेलनात प्रा. रत्नमालाताई भोयर,मंगला गोंगले, शितल कर्णेवार ,प्रीती जगझाप, वृंदा पगडपल्लीवार, किरण चौधरी, भारती तितरे ,गायत्री शेंडे व मंजुषा दरवरे या महिला साहित्यिकांना झाडीबोली महिलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे
    – *लक्ष्मण खोब्रागडे* , सचिव’ झा.बो.सा. मं.चंद्रपूर
    —————————————-