भ्रष्टाचार विरोधी मोर्चा संघटनेची छत्रपती संभाजी नगर येथे मराठावाडा आणि विदर्भाची बैठक संपन्न

39

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 28 नोव्हेंबर) छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी शासकीय रेस्ट हाऊस येथे दि. 23-11-23 ला भ्रष्टाचार विरोधी मोर्चा या संघटनेची कार्यकारिणी बैठक गुरुवार रोजी संपन्न झाली प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुलभाऊ गंगावणे साहेब हे उपस्थित होते.

सर्व पदाधिकाऱ्यांनी गंगावणे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

गंगावणे यांच्या शुभ हस्ते भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे मराठावाडा अध्यक्ष म्हणून दिगांबर थोरात यांची नियुक्ती करण्यात आली.

हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी रवींद्रनाथ मोरे यांची नियुक्ती करण्यात आली, लोकहित लाईव्ह न्युज चॅनलचे संपादक विजय कदम यांची भ्रष्टाचार विरोधी मोर्चा यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली व पत्रकार दिलीप मुनेश्वर यांची यवतमाळ शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली नांदेड जिल्हा अध्यक्षपदी राज रतन नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली व राहुलजी गंगावणे साहेब यांच्या हस्ते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन नियुक्तीपत्र देण्यात आले.

शेकडो कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते महाराष्ट्र राज्यामध्ये जो भ्रष्टाचार चालत आहे त्या भ्रष्टाचाराला कशाप्रकारे आळा घालता येईल व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नियंत्रण कसे ठेवता येईल यावर मार्गदर्शन गंगावणे साहेब यांनी केले.