२५ डिसेंबर रोजी चिमुर येथे भारतीय स्त्री मुक्ती दिनाचे आयोजन

157

 

 

सुयोग सुरेश डांगे,विशेष प्रतिनिधी मो. 8605592830

 

चिमुर-सम्बोधी बुध्द विहार, नेहरू वार्ड चिमुर व तक्षशिला बुध्द विहार, आझाद वार्ड, चिमुर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २५ डिसेंबर रोजी भारतीय स्त्री मुक्ती दिन, मनुस्मृती दहन दिन व सम्बोधी बुध्द विहार व तक्षशिला बुध्द विहार, यांचा वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सकाळी १० वाजता सम्बोधी बुध्द विहार, नेहरू वार्ड चिमुर व तक्षशिला बुध्द विहार, आझाद वार्ड, चिमुर येथे बुध्द वंदना झाल्यानंतर दुपारी १२ वाजता मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला असुन या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागपुर उच्च न्यायालयाचे अॅड. आकाश बांबोडे राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते सतिश इंदुरकर यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रा. डॉ. चंद्रभान खंगार, प्रा. प्रज्ञा खोब्रागडे, सुरेश डांगे, प्रज्ञा राजुरवाडे, रसिका झिलटे, एस.ए. पाटील, नरेश पिल्लेवान, हर्षद रामटेके, आदि मान्यवर मार्गदर्शन करणार आहे.

सायंकाळी ६ वाजता भोजनदान झाल्यनंतर कव्वाल सुरमा बारसागडे यांचा भीम गित गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थीत राहण्याचे आवाहन सम्बोधी बुध्द विहार, नेहरू वार्ड चिमुर व तक्षशिला बुध्द विहार, आझाद वार्ड, चिमुर च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.