अमेरीकन प्रा. डॉ. लॉरेन यांची गंगाखेड शहरास भेट

    322

     

    गंगाखेड : अमेरीकेतील कॅलीफोर्नीया विद्यापीठाच्या प्रा. डॉ. लॉरेन बच या यज्ञ संस्कृतीच्या अभ्यासासाठी गंगाखेड शहरात आल्या होत्या. संस्कृत विषयात डॉक्टरेट प्राप्त लॉरेन यांनी शहरातील यज्ञभूमीस भेट देवून यज्ञ संस्कृती जाणून घेतली.
    तसेच शहरातील विविध स्थळांना भेटी दिल्या.

    प्रा. लॉरेन या सावित्रीबाई फुले विद्यापीठ अंतर्गत संशोधन करत आहेत. त्यांची ही आकरावी भारत भेट होती. यज्ञ संस्थेचे प्रमुख यज्ञेश्वर सेलूकर व सहकाऱ्यांनी त्यांना आवश्यक माहिती पुरवली. गंगाखेड भेटीवर आलेल्या प्रा. लॉरेन बच यांनी गोविंद यादव यांच्या मैत्रेय निवासस्थानी आज भेट दिली. याप्रसंगी त्यांचे पारंपारीक पद्धतीने स्वागत करण्यात आले. तसेच संत जनाबाई यांची प्रतिमा भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी भांडारकर प्राच्य शोध संस्थान, पुणे चे निवृत्त प्राध्यापक श्री थीटे सर, श्रीमती शांताबाई यादव, नागेश पैठणकर, रमेश औसेकर, सुहास देशमाने, वर्षा गोविंद यादव, नंदीनी व्यंकटेश यादव, स्वाती रामा गिराम, निकीता बानाईत व परिवार ऊपस्थित होता. या परदेशी पाहुणीला बघण्यासाठी या भागातील बाळगोपाळांनीही गर्दी केली होती. पंरपरागत आणि कौटुंबिक स्वागताने प्रा. लॉरेन भारावून गेल्याचे दिसून आले.