मागासवर्गीय कुटुंबातील घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांना सरपंच व सचिव यांनी दहा हजार रुपयांची केली मागणी

255

 

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 30नोव्हेंबर) तालुक्यातील मौजे टाकळी (राजापूर) येथील सरपंच व सचिव यांनी मागासवर्गीय बौद्ध कुटुंबातील घरकुल मंजुरीसाठी बाबा गणपत हापसे राहणार टाकळी राजापूर या लाभार्थ्यांना ग्रामपंचायतचे सरपंच आणि सचिव यांनी 10 हजार रुपयांची मागणी केल्याची आम्हाला माहिती मिळताच गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.

10 हजार रुपयांची मागणी करणाऱ्यावर चौकशी लावून कडक कार्यवाही करण्यात यावी.

हापसे यांनी आपल्या परिस्थीती प्रमाणे घरकुल मंजुरीसाठी नाईलाजाने 5 हजार रुपये देतो असे कबूल केले होते.

पण सरपंच आणि सचिव यांनी आताच 10 हजार पाहिजे..! तरच घरकुल मंजुर होईल…!!
असे बोलले उद्धट भाषेत बोलून लाभार्थ्याची दमछाटी केली आहे.

अशी माहिती आम्हाला मिळतातच आम्ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तक्रार अर्ज दाखल करून पैशांची मागणी करणाऱ्या सरपंच आणि सचिव यांच्यावर कडक कार्यवाही करुन त्या गरीब लाभार्थ्यांना घरकुल मंजुर करुन न्याय देण्यात यावा. असे तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे.

यावेळी अर्जदार दिलीप मुनेश्वर, सिध्दार्थ दिवेकर आणि पीडित लाभार्थ्याची बाबा गणपत हापसे यांनी सही करून उपस्थित होते.