बोरी(खुर्द)शिवारात पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात

60

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद- सतत दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले पिकांचे पंचनामे करण्यास पुसद तालुक्यातील बोरी खुर्द शिवारात सुरुवात करण्यात आली आहे.

बोरी खुर्द शिवारामध्ये२७,ते२८ नोव्हेंबर च्या झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. दिनांक २ डिसेंबर शनिवारपासून पंचनामेसाठी सुरुवात झाली आहे. सदर पंचनामेसाठी कृषी विभागाचे कृषी सहायक एस. पी .जाधव , ग्रामसेवक बाळासाहेब कबले ,महसूल विभागाचे तलाठी जया खैरे तसेच कृषी मित्र विश्वनाथ मुखरे व कोतवाल नेहा जाधव यांनी संयुक्तरीत्या पंचनामाला सुरुवात केली आहे. या पंचनामांमध्ये कापूस, तूर, गहू, हरभरा, इतर या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.