माधव शिंदे (नांदेड, जिल्हा प्रतिनिधी) मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.30जुलै):-गाई वासरे,आडळून आल्याने, गोवंशाची तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलीसाच्या ताब्यात देण्यात आले.
दिनांक २९ जुलै रोजी गोवंशाची कर्नाटकात तस्करी करणाऱ्या आरोपींना सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडले आहे.सकाळी ६ सुमारास नांदेड ते बिदर हायवे रोडवर हाणेगाव पेट्रोल पंप जवळ अडविण्यात आले.त्यात ३ गाई,३ वासरे,१ बैल सात जनावरे असून हे कर्नाटकत कत्तलखान्याला नेत असताना तस्करांना पकडण्यात आले.
असलेला महिंद्रा पिकअप ( एम एच,२६,ए डी,८७९२ या वाहन पोलिस ठाणे मरखेल येथे सुपुर्द करण्यात आले.विष्णुकांत मारोती चांमलवाड यांच्या फिर्यादीवरून, आरोपी १)अलिम बेग निझाम बेग व्यापारी,रा.धामनगाव ता.मुखेड येथील वय (३० ) २) भानूदास दिगंबर ताटे वाहन चालक, या आरोपीवर मरखेल पोलिस ठाण्यात, प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम १९६०,महाराष्ट्र पशू संरक्षण नियम १९७६, मोटार वाहन अधिनियम,१९८६,गुनह,१३२/२०२० कलम ११ (१)(d)५ (अ) कलम ६६ (१) १९२असे PSI अजित बिरादार यांच्या आदेशाअनुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून, पुढील तपास कांमी,HC/२८२२,कनकवळे यांनी करत आहेत.यावेळी गजानन पाचाळ,बजरंग दल जि.सं. प्रशांत दासरवार (गोरक्षा प्रमुख)निरंजन रायकवाड सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.दरम्यान बकरी ईद निमित्त गोवंश हत्या होउनये यांची खबरदारी प्रशासनाने घ्यावी,असी मागणी सामाजिक कार्यकर्त्यानी केली.

Breaking News, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED