अट्टल पाच दरोडेखोरांच्या चकलांबा पोलीसांनी आवळल्या मुसक्या

173

🔸सपोनी नारायण एकशिंगे यांची मोठी कामगिरी; लाखोंचा मुद्देमाल जप्त

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.2फेब्रुवारी):-बऱ्याच दिवसांपासून बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या विषयी सामाजिक प्रश्न ऐरावणीवर आला असून त्या अनुषंगाने मोठमोठे मोर्चे,आंदोलने, विराट सभा होत असून त्यामधून मोठ्या प्रमाणात जाती-जातीमध्ये द्वेष, तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आपण पाहत आहोत.

सर्वसाधारणपणे गुन्ह्यास प्रतिबंध करणे, गुन्ह्याचा शोध लावणे व कायदा व सुव्यवस्थेचा राखणे हे पोलिसांचे मुख्य तीन कामे समजली जातात परंतू संधीचा फायदा घेऊन चकलांबा पोलिस ठाण्याअंतर्गत विविध गांवात जबरी चोरी ,दरोडा असे प्रकार घडत होते याच गुन्ह्यातील पाच अट्टल दरोडे खोरांना मोठ्या शिताफितीने चकलांबा पोलिसांनी मुसक्या आवळल्या असुन त्यांना ताब्यात घेतले आहे

याबाबद सविस्तर माहिती अशी की, सध्याच्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता पोलिसांना आपले सर्व बळ, ताकत ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखणे कामी खर्च करावी लागत आहे. त्यातही पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. तीन महत्त्वाच्या कर्तव्यापैकी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठीच पोलिसांना जास्त वेळ द्यावा लागत असल्याकारणाने गुन्ह्यांचा प्रतिबंध व गुन्ह्यांचा शोध ही पोलिसांची कर्तव्य पार पाडण्यात पोलीस कमी पडत आहेत.

ही गोष्ट खरी असली तरी काही कर्तव्यनिष्ठ ध्येयवेडे अधिकारी आपल्या कर्तव्याचे भान ठेवून संधी साधू लोकांचे मनसुबे उध्वस्त करण्यात रात्रीचा दिवस करून गुंतलेले असतात. सामाजिक व राजकीय परिस्थिती व त्यातून उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यात पोलीस गुंतलेले असताना अट्टल दरोडेखोर,चोर या संधीचा गैरफायदा घेतात. याचाच गैरफायदा संपूर्ण बीड जिल्ह्यात दरोडे, घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांनी घेतला असून मोठ्या प्रमाणावर दरोडे घरपोडी चोरीचे सत्र मागील काही दिवसापासून आपण पाहत असून ते थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

त्यास चकलांबा पोलीस ठाणे ही अपवाद नाही. मागील काही दिवसात चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तीन जबरी चोरीचे तसेच पाच रात्रीच्या घरफोड्या, एक दिवसाची घरपोडी झालेली आहे. परंतु चकलांबा पोलीस स्टेशन कडील अधिकारी कर्मचारी यांनी जिगर दाखवत तीनही जबरी चोऱ्या उघडकीस आणून आरोपी सह मुद्देमाल जप्त केला आहे. रात्रीच्या घरफोडीचे मोठे आव्हान चकलांबा पोलिसांसमोर होते. चकलांबा पोलीस घरफोडी करणाऱ्या चोरांच्या मागावर बऱ्याच दिवसापासून होते. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे चकलांबा पोलिसांना मोठ्या सीताफिने रेकॉर्ड वरील अट्टल पाच दरोडेखोरांना पकडण्यात यश आले.

त्यांच्यावर दरोडा घरफोडी, जबरी चोरी, मोक्का यासारखे अनेक गंभीर गुन्हे विविध जिल्ह्यात व पोलीस स्टेशनला दाखलअसून त्यांना संबंधित गुन्ह्यात अटक केली असून लाखोंचा मुद्द्यमाल जप्त करण्यात आलेला आहे. हे चकलांबा पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू, एक लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून जिल्ह्यातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच या पाच अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या चकलांबा पोलिसांनी आवळल्या आहे यामध्ये 1) दीपक गौतम पवार 2) गोविंद गौतम पवार 3) राजेश दिलीप भोसले सर्व राहणार टाकळी अंबड ता पैठण जि संभाजीनगर 4) नितीन मिश्रा चव्हाण रा जोड मालेगाव ता गेवराई जि बीड 5) किशोर दस्तगीर पवार रा पैठण जिल्हा संभाजीनगर असे असून सदर कारवाई ही मा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर उप विभागिय पोलिस अधिकारी, नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे, पोलिस उपनिरीक्षक अनंता तांगडे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, सफो गाडे, पोह बारगजे, पोह केदार, पोह खेडकर, पो शि खेत्रे, पो शि घोंगडे यांनी केली