सुभेदार रामजी बाबा आंबेडकर ह्यांची प्रतिमा जेतवन बुद्ध विहारास भेट

76

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.2फेब्रुवारी):-तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.2 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.

सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांचे प्रतिमेला मोरेश्वर पाटील व प्रदीप मेश्राम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. या प्रसंगी योगेश मेश्राम यांनी सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. रामजी बाबा आंबेडकर हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते.

अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामितुन बाहेर काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती.अशा शब्दात मान्यवरांनी सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. या प्रसंगी औचित्य साधून उपासिका वंदना कवडूजी मेश्राम यांच्या वतीने योगेश कवडू मेश्राम यांनी सुभेदार रामजी बाबा आंबेडकर ह्यांची प्रतिमा जेतवन बुद्ध विहार येथे सस्नेह भेट दिली.

या प्रसंगी भीमाबाई गजभिये, शकुंतला मेश्राम, लीलाबाई बोरकर,चिराग पाटील ,निशांत शेंडे, आदी. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आशिक रामटेके यांनी केले.