विलासराव गडांकुश साहेबांनी केलेल्या कामाची समाज निश्चितच दखल घेईल- तुषार मोतलिंग

179

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.11फेब्रुवारी):-जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी सत्य असून या कालावधीमध्ये जे सामाजिक कार्यातून आपल्या कार्याचा ठसा उमटवतात. त्यांचा समाज यथोचित सन्मान करत असतो. कालकथीत विलासराव गडांकुश साहेब यांनी केलेल्या कार्याची दखल समाजाने घेतली आहे. असे प्रतिपादन बहुजन मुक्ती क्रांतीचे राज्य कार्यकारणी सदस्य तुषार मोतलिंग यांनी वडूज ता. खटाव जिल्हा सातारा येथे केले.

खटाव तहसीलदार म्हणून महसूल विभागात कार्यरत होते . त्या विलासराव गडांकुश यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बौद्धाचार्य रणपिसे यांनी बौद्ध पद्धतीने सर्व विधी करून उपस्थित त्यांना धार्मिक महत्त्व पटवून दिले.

शासकीय शासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी शासकीय योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या पदाचा चांगल्या पद्धतीने वापर केला पैशाला दुय्यम स्थान देऊन त्यांनी माणुसकी जपल्यामुळे सर्व जाती धर्मातील लोक त्यांना अन्नदाता मानत होते त्यांनी अनेकांचे कल्याण केले आज असे कार्यकर्ते व अधिकारी लाभले दुर्मिळ झालेले आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाची नाळ असणारे विलासराव गडांकुश हे कायम स्मरणात राहिलेले आहेत अशा शब्दात अनेक व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या वेळेला जुने पॅंथर व रिपब्लिकन पक्षाचे खंदे ज्येष्ठ नेते सुनील भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, अजित जगताप,नगरसेविका सौ शोभा बनसोडे, सौ शोभा वायदंडे, तुषार बैले,राजू फडतरे, कुणाल गडांकुश, सोमनाथ आवळे, सुशांत पोळ, सोमनाथ आवळे, अजित साठे, संतोष भंडारे ,परेश जाधव, अजित कंठे , उत्तमराव म्हस्के, गणेश भोसले , संजय जगताप, अनिल माळी, ओमकार चव्हाण यांच्यासह प्रा . बंडा गोडसे, मुन्ना मुल्ला,नितीन राऊत विक्रमसिंह काळे, बी आर जगताप, सुधाकर शीलवंत, राजू जगताप,शैलेश जाधव, थोरात, राजू फडतरे , शिवाजी काळे,मुकुंद माने, अरविंद मामा जाधव, सागर भिलारे,नितीन मोरे , सौ थोरात,तानाजी वायदंडे, अजित नलावडे, विठ्ठल नलावडे, श्रीमती कल्पना गडांकुश, ऋतुजा गडांकुश , राऊत.माळी, गायकवाड, कदम, गोडसे, जाधव, कांबळे, चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी बौद्ध धम्मानुसार धार्मिक विधी केल्यानंतर अनेक मान्यवरांनी गडांकुश यांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. समाजातील विविध स्तरातील ग्रामस्थ विविध मंडळाचे पदाधिकारी महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.