वरूड येथे “संत्रा निर्यात” विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न !

84

🔸अपेडा व राज्य कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.11फेब्रुवारी):-संत्र्याच्या निर्यात गुणवत्तेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि थेट संत्र्यांच्या खरेदीसाठी FPOs/FPCs ला निर्यातदारांशी जोडणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देशाने हॉटेल श्रीकृपा वरुड येथे दिनांक ७ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

यावेळी उद्घाटन सत्राचे अध्यक्ष आनंदराव राऊत, सदस्य, APEDA, प्रशांत वाघमारे, DGM APEDA, राहुल सातपुते जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अमरावती,
दिनेश डागा डी जी एम MSAMB, अमरावती राजेंद्र रहाटे DDM नाबार्ड अमरावती, डॉ राजेंद्र वानखडे कृषि संशोधन केंद्र अचलपूर, श्रीधरराव ठाकरे सदस्य महाऑरेंज, रमेश जिचकार, पुष्पक खापरे, प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी रुपेश वाळके उपस्थित होते.
अमरावती आणि नागपूर या संत्रा उत्पादक जिल्ह्यांतील सुमारे १५० उत्पादक आणि एफपीओ/एफपीसी सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी प्रशांत वाघमारे,DGM अपेडा आणि प्रादेशिक प्रमुख, RO मुंबई यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि त्यांनी विदर्भातील संत्रा निर्याती करिता असलेला वाव व निर्याती करिता APEDA चे योजना याविषयी उत्पादकांना सविस्तर मार्गदर्शन केले, ज्यात APEDA चे आदेश, निर्यातीची प्रक्रिया, Traceability System म्हणजेच citrus.net, Farmer Connect Portal, अपेंडा चे आर्थिक सहाय्य योजना इ योजना विषयी माहिती दिली कार्यक्रमादरम्यान मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत, प्रणिता चौरे BDM APEDA यांनी मेरा युवा भारत संकल्पना आणि पोर्टलवर युवकांसाठी नोंदणी प्रक्रियेबद्दल माहिती दिली. तसेच MYB पोर्टलवर कार्यक्रमादरम्यान सुमारे 30 तरुणांनी यशस्विरित्या नोंदणी केली.

दिनेश डागा DGM, MSAMB अमरावती यांनी MSAMB द्वारा राबावाण्यात येणाऱ्या योजनाची माहिती दिली,राजेंद्र रहाटे DDM नाबार्ड यांनी नाबार्डच्या योजनाची माहिती दिली सोनाली लोहारीकर डारेक्टर SDF एक्स्पोर्ट यांनी संत्रा निर्यात करणे संबंधी तांत्रिक मार्गदर्शन केले, तसेच मितेश मुरूळकर यांनी सविस्तर सादरीकरण केले

डॉ राजेंद्र वानखडे कृषि संशोधन केंद्र अचलपूर यांनी संत्रा आंबीया व मृग बहार व्यवस्थापन याविषयीं मार्गदर्शन केले कार्यक्रमाकरिता APEDA नोंदणीकृत निर्यातदार मे. SDF प्रॉडकशन,रवी कुमार फेअर एक्स्पोर्ट लुलु ग्रुप,जेम्सन जे. के ॲग्रो इंडस्ट्रीज, मे. पेठे ऑरेंज, मे. रमाडा फार्म्स, मे. श्रमजीवी फार्मर प्रोड्युसर कंपनी, मे. नागपूर संत्रा उत्पादक कंपनी काटोल, मे. महा ऑरेंज, मे. निलय ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड, M/s. ईवा एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, मे. वर्धार्थ संत्रा जैविक शेती मिशन एफपीसी लि., मे. VEGROW, Pvt., Ltd, M/s. कृषीप्रेन्युर्स एफपीसी लि. इत्यादि निर्यातदार उपस्थित होते यावेळी निर्यातदारांनीही विदर्भातील संत्री मिळविण्यात उत्सुकता दाखवली.

शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. नाबार्ड, एमएसएएमबी आणि राज्य कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा खरेदीदार विक्रेता सभा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अपेडाचे आभार मानले आणि त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल जी श्रीराव बीटीएम वरुड व आभार प्रदर्शन एस बी वरघट कृषि अधिकारी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रवीण सातव कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय वरुड व मोर्शी येथीलअधिकारी,कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.