जनवादी लेखक संघाकडून कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ल्यांचा निषेध व कठोर कारवाईची मागणी 

94

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.11फेब्रुवारी):-२ फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात परीक्षेचा असाइनमेंट म्हणून सादर करण्यात आलेल्या ‘जब वी मेट’ हे नाटक आरएसएस-भाजपशी संलग्न विद्यार्थी संघटना अभाविपने गोंघळ माजवून उधळून लावले आणि तोडफोड केली. अभाविप आणि भाजयुमो कडून प्रा.प्रवीण दत्तात्रेय भोळे आणि पाच विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली, ज्याच्या आधारे या सहा जणांना अटक करण्यात आली.

आपल्या निवेदनात, विद्यापीठ प्रशासनाने गोंधळ निर्माण करणाऱ्यांची बाजू घेत, दुखावलेल्या भावनांबद्दल केवळ माफी मागितली नाही तर ‘कोणत्याही पौराणिक किंवा ऐतिहासिक व्यक्तीचे विडंबन’ हे ‘पूर्णपणे चुकीचे आणि प्रतिबंधित’ असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक अनेक सदस्यांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा देत सुरू केली गेली.

2022 मध्ये गुजरातच्या वरोडा येथील सयाजीराव विद्यापीठात नेमकी हीच परिस्थिती पाहायला मिळाली होती, जिथे ललित कला विद्याशाखेत परीक्षेशी संबंधित मूल्यमापनासाठी आयोजित करण्यात आलेले प्रदर्शन सुरू होण्यापूर्वीच अभाविपचे सदस्य तेथे तोडफोड करण्यासाठी पोहोचले आणि त्यानंतर ज्या कलाकृतींची तोडफोड करण्यात आली. त्यांच्या ‘भावना दुखावल्या गेल्या’ आणि त्याचे निर्माते, कुंदन यादव, जो प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता, त्याला विद्यापीठाच्या सिंडिकेटने बडतर्फ केले आणि त्याचे शिक्षक, पर्यवेक्षक आणि प्राध्यापकांच्या डीनला कारणे दाखवा नोटीस बजावली.

पुणे विद्यापीठाच्या घटनेनंतर काही दिवसांनी, ६६ वर्षीय ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी आणि त्यांचे इतर सहकारी यांचे व्याख्यान ९ फेब्रुवारी रोजी पुण्यात निर्भय बनो विचार मंचाच्यावतीने आयोजित केले गेले होते. सभे अगोदरच या सर्वांना पोलिसांनी 3 तास ताब्यात घेतले. ज्या मार्गावरून हे सर्व जात होते, त्या मार्गावर पोलीस बंदोबस्त असतानाही प्रभात रोड, कर्वे रोड, शास्त्री मार्ग, दांडेकर या मार्गावर अर्ध्या तासात वेगवेगळ्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांच्या जमावाने ४ वेळा दगड, शाई, लोखंडी रॉडने पाठलाग करत हल्ला केला. पाठलाग करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. तरी हल्ला करत असलेल्या एका ही भाजप कार्यकर्त्याला त्यावेळी पुणे पोलिसांनी अटक केली नाही.

‘जनवादी लेखक संघ’ कट्टर हिंदुत्ववादी विचारांशी संबंधित संघटनांच्या या गुंडगिरीचा आणि खुनी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. हे हल्ले म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट हल्ला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारला प्रश्न विचारणाऱ्या लेखक आणि विचारवंतांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. हल्ल्यानंतर निखिल वागळे यांनी ट्विट केले की, “हा हल्ला पोलिसांच्या संगनमताने झाला आहे. या हल्ल्याच्या भीतीने ते आवाज बंद करणार नाहीत. ही ज्योतिबा फुले आणि आंबेडकरांची भूमी आहे.”

जनवादी लेखक संघ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावरील हल्ल्याचा आणि त्यासंदर्भातील प्रशासन आणि पोलिसांच्या वृत्तीचा निषेध करतो. जलेसच्या केंद्रीय कार्यकारिणीने ललित कला विद्याशाखेच्या अध्यक्षांवर आणि विद्यार्थ्यांवर लावलेले आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे आणि भावना दुखावण्याच्या नावाखाली गोंधळ आणि तोडफोड करणाऱ्यांवर त्वरित योग्य कारवाई करावी.

भाजपाच्या राजवटीत महाराष्ट्रात अशा उन्माद जमावाचे हल्ले वाढत आहेत. या सर्व हल्ल्यांमध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका संशयास्पद आहे. हा हल्ला म्हणजे हिंसेच्या बळाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न आहे. आरएसएस-भाजप कार्यकर्त्यांवर या फॅसिस्ट हल्लेखोरांवर कडक पोलीस कारवाई करण्याची जनवादी लेखक संघाची मागणी केली. या दोन्ही हिंसक घटनांचा जलेस महाराष्ट्र राज्य समिती तीव्र शब्दात निषेध करत देशभरातील कला आणि लेखन क्षेत्राशी निगडित सर्व कलाकार आणि साहित्यिकांनी या दडपशाहीला उघडपणे विरोध करण्याचे आवाहन सुधा अरोरा, मुख्तार खान,हृदयेश मयंक, सुबोध मोरे, शैलेश सिंह, संजय भिसे यानी केले.