मराठा आरक्षनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या म्हसवड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

382

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.15फेब्रुवारी):-मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सरांटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत म्हसवड शहरातील. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला.

यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सकाळपासूनच सर्व दुकाने बंद होती. शहरात नेहमी गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बसस्थानक परिसर ), महात्मा फुले चौकतही बंदमुळे लोकांची वर्दल नसल्यामुळे शांतता होती व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उत्स्फूर्त पणे बंद ठेवल्यामुळे बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.

गेली सहा दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील हे उपोषनास परत बसले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु येथील सकल मराठा समाजाने बुधवारी येथील आठवडा बाजार असल्याने कालचा बंद आज गुरुवारी ठेवण्यात आल्याचे कालच जाहीर केले होते सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून म्हसवड पोलीस स्टेशन कडून चोख बंदोबस्त ठेवणेत आला होता. बंद ला व्यापारी वर्गाने स्वयंपूर्तीने बंद मध्ये सहभाग दर्शविल्यामुले मराठा समाजाकडून आभार माणण्यात आले.