इतिहासाची साक्ष ठेवून भविष्य घडवा- लक्ष्मण मेश्राम

212

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26फेब्रुवारी):-छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्ण ,नियोजनबध्द आणि दूरदृष्टी ठेवून केलेली आहे त्यामुळे त्यांना यश मिळत गेले त्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपले कार्य करावे असे प्रतिपादन श्री लक्ष्मण मेश्राम यांनी केले. ते मौजा चोरटी येथील शिवजन्मोत्सव कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

मौजा चोरटी येथे शिवजन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी 2024 रोज सोमवारला छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य पालखी काढून त्यात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.ठीक 10.00वाजता. सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली आणि ठीक 2.00 वाजता. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंताजी बनपूरकर अध्यक्ष से.से सं चोरटी उपाध्यक्ष माननीय कुमारी सुनीताताई वलके पोलीस पाटील चोरटी. मुख्य मार्गदर्शक म्हणून मा. लक्ष्मणजी मेश्राम तसेच या कार्यक्रमाचे स. सत्कारमूर्ती हर्षवर्धन गायधने जि.प शाळा.चोरटीतसेच मरसकोल्हे सर, सहा. शिक्षक शिंदपुरे सर सहा. शिक्षक व नरेंद्रजी ठाकरे आरोग्य सेवक पोंभूर्णा इत्यादी उपस्थित होते . बाळकृष्ण मेश्राम यांच्या उत्तम अशा कामगिरीबद्दल तसेच सामाजिक कार्याची दखल म्हणून दत्त मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला. पुढे लक्ष्मण मेश्राम म्हणाले की,एक फ्रेंच अधिकारी एका मावड्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे कसे काय सर्व गडकिल्ले जिकतात.

त्यावर मावडा खूप सुंदर उत्तर देतो.आमचे महाराज अभ्यास करतात. आणि अभ्यास व नियोजन करूनच युद्धनिती, कुटनिती आणि गनिमीकावा याचा आणि खास अंधाऱ्या रात्री सर्व मोहिमा आखून गडकिल्ले जिकले आहेत. याचा वेध घेऊन आजच्या पिढीने त्याचे विचार अंगीकारले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करून आपले आयुष्य घडवावे असे लक्ष्मण मेश्राम म्हणाले. त्यानंतर हितेश कुवे यांनी शिवाजी महाराज यांनी यांच्या काळातील संस्कृती खूप चांगली आहे त्या संस्कृती चा अंगिकारून आयुष्य उज्वल करू शकता. यानंतर गायधने सर बोलतानी म्हणाले, की नियोजन करायचे शिकायचे असेल तर शिवाजी महाराज यांच्या कडून शिका. कार्यक्रमात बक्षीस वितरण घेण्यात आले. गावातील लोकांनी उत्फ्रूर्त होऊन स्पर्धे करिता पारितोषिक दिले. यात रांगोळी स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धा याचे बक्षीस वितरण घेण्यात आले.

रांगोळी स्पर्धेतील प्रथम पारितोषिक कु. भावना रुपचंद बुरडे. द्वितीय पारितोषिक प्रीती रमेश राऊत तर तृतीय पारितोषिक यामिना विकास तलमले आणि सामान्य ज्ञान स्पर्धा दोन वयोगटानुसार एक 10ते 14 गट तर 15ते त्यापुढील वयोगट होते. 10ते 14 वयोगटातील स्पर्धतील प्रथम पारितोषिक प्रचीत विनोद गेडाम द्वितीय पारितोषिक अदिभ उमेश बारसागडे तृतीय पारितोषिक नक्षम किशोर मेश्राम तर 15 ते पुढील वयोगट येथील प्रथम पारितोषिक शुभांगी प्रकाश ढोरे द्वितीय पारितोषिक यामिना विकास तलमले तृतीय पारितोषिक समीर अरुण राऊत यांना पारितोषिक देण्यात आले.

शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त सांस्कृतिक नृत्य स्पर्धा या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रेमलाल धोटे ओबीसी तालुकाध्यक्ष भाजपा सहउद्घाटक गोपालजी नागपुरे अध्यक्ष संदिपजी तुपट इंजी. वायगाव सहध्यक्ष मायाशिंग बावरी उपाध्यक्ष रक्तविर सेना प्रमुख पाहुणे आशिषजी तूपट रतन बनकर प्रकाश ननावरे मा. प. स.स मदन बारसागडे विश्वनाथ ढोरे नरेंद ठाकरे राजेंद्र ठाकरे आशाताई चंदनखेळे सुमन सहारे प्रीती गेडाम सुधीर नक्षिने शंकर ननावरे श्रीराम घुटके श्रीराम राऊत हरिराम राऊत राष्ट्रपाल बोराडे बुराडे आधी प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला उपस्थित होते या सांस्कृतिक नृत्य स्पर्धेचे उद्घाटक प्रेमलालजीत होते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा दिल्या.

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीपजी तुपट यांनी सांस्कृतिक वारसा जपलेक्क आणि त्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म उभा करून घेणे ही आपली नैतिक जबाबदारी असून आणि आपल्या मुलांमध्ये असणारे सुप्त गुण या स्पर्धेच्या माध्यमातून सामोरे येत असतात असे संदीप तुपट यांनी म्हटले आहे या सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत एक नृत्य व समवनउत्त्या समूह नृत्य ही स्पर्धा घेण्यात आलेली होती.या स्पर्धेतील परीक्षक म्हणून आशिषजी तूपट व दुसरे परीक्षक सुधीर नक्षिणे होते. यातील एक नृत्य स्पर्धेतील प्रथम पारितोषिक आहे कु. प्रतीक्षा योगेश्वर राऊत द्वितीय पारितोषिक कु. अंजली भास्कर प्रधान द्वितीय पारितोषिक तृतीय तृतीय पारितोषिक कुमारी अनन्या अनन्या ज्ञानेश्वर राऊत तर समोर नृत्य मध्ये समूह नृत्य मध्ये प्रचित गेडाम ग्रुप याला प्रथम पारितोषिक तर द्वितीय पारितोषिक तन्मय नवनाथ राऊत ,तृतीय पारितोषिक आरोही व तृपी ग्रुप यांना पारितोषिक मिळाला.