महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने मार्केटिंग वेबिनार

28

🔸युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश ननेटवर्क)

चंद्रपूर(दि.3ऑगस्ट):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरिता 12 ऑगस्ट 2020 रोजी एक दिवस कालावधीचे ऑनलाइन डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा वेबीनारद्वारे आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेत ऑनलाईन व्यवसाय संधी, आयडिया मार्केटिंग स्ट्रॅटेजी, गुगल अॅडव्हर्ड, गुगल अॅनालिटिक्स, सोशल मीडिया मार्केटिंग, युट्युब, घरी बसून पैसे कमविण्याची संधी व उद्योग उभारणी प्रक्रिया इत्यादी विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक-युवतींनी दि. 11 ऑगस्ट 2020 पर्यंत अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही.राठोड (मो.क्र.9403078773, 07172-274416), व कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे (मो.क्र.9309574045) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधून सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.