अनुदान योजना व बीज भांडवल योजनेचा लाभ घ्यावा

  37

  ?महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे आवाहन

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर(दि.3ऑगस्ट):-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. चंद्रपुर मार्फत अनुसुचीत जाती व नवबौध्द नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशांने चालू आर्थिक वर्ष सन 2020-21 मध्ये योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक डी.एम बारमासे यांनी केले आहे.

  अशा आहेत योजना:-

  अनुदान योजना:-

  अनुदान योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजार पर्यंत आहे. तर अनुदान 10 हजार पर्यंत देण्यात येते व राहिलेली रक्कम बॅकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परत सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे,

  बिजभांडवल योजना:-

  महात्मा फुले महामंडळ प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलामधून बिज भांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे. प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजार ते 5 लाखापर्यंत आहे. प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बिजभांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदानाचा रुपये 10 हजार समावेश आहे.

  बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकरण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाचे आत करावी लागते.अर्जदाराचा 5 टक्के स्व:ताचा सहभाग भरावयाचा आहे. योजनेच्या सविस्तर माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.