विकास पाटील यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर..

81

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : तालुक्यातील बाभुळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा, पत्रकार विकासराव देविदास पाटील यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी व पत्रकारितेसाठी “साई कलारत्न समाजभूषण” पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन निर्मित “साई कलारत्न समाजभूषण २०२४” पुरस्कार जाहीर झाल्याचे अधिकृत पत्र पुरस्कार सोहळा समितीकडून आज रोजी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे क्रियाशील सदस्य विकासराव देविदास पाटील यांना मिळाले आहे. नवं नवोदित कलाकारांच्या व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याच्या महत्वपुर्ण उद्देशाने प्रदान केला जाणारा साई कलारत्न समाजभुषण पुरस्कार सोहळा शिर्डी येथे दि.०३ मे २०२४ रोजी पुरस्कार सोहळा प्रदान करणार आहेत. श्री. पाटील यांना साईरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.