कर्मचारी निवडणुकीच्या कामात अन दाबकाहेटी येथे अवैध रेती उत्खनन जोमात ट्रॅक्टर मालक जांभूळघाट येथील.?

324

 

कार्यकारी संपादक// उपक्षम रामटेक
📱9890940507

चिमूर तालुक्यातील दाबकाहेटी येथे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन मागील दोन महिन्यापासून चालू असून. रात्री 11 ते सकाळी सहा या वेळेला दोन ट्रॅक्टरने दाबकाहेटी येथे अवैध रेती उत्खनन चालू आहे.
संबंधित तलाठी फोन केले असता मी निवडणुकीत कामात व्यस्त आहे असे उत्तर मिळाले व संबंधित मंडल अधिकारी यांना फोन करा असं त्यांनी सांगितलं. मंडल अधिकारी यांना फोन केले असता त्यांनी तहसीलदाराकडे तक्रार करा असे सांगितले.
पूर्व विदर्भामध्ये 19 एप्रिल या तारखेला लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे आचारसंहिता लागू झालेल्या आहेत संबंधित सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामाला लागलेला आहेत त्यामुळे अवैध उत्खनन जोमात चालू आहे.
मागील तीन चार वर्षापासून दाबकाहेटी येते एकच व्यक्ती अवैध उत्खनन करत असून त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी चिरीमिरी घेतली यात तीळ मात्र शंका उरलेली नाही.

आज रात्रीला सुद्धा अवैध उत्खनन होणार असून पुढील 19 तारखेपर्यंत सुद्धा अवैध उत्पन्न चालू राहणार यात मात्र शंका नाही.