छत्रपतींचे प्रेरणादायी विचार नेहमीच जगण्याची नवी उमेद देतील; राहुल जैन धरणगाव विकास मंच तर्फे छ. शिवरायांच्या स्मृतीस अभिवादन..

    55

    धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

    धरणगाव : स्वराज्य निर्माते, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त धरणगाव विकास मंचच्या वतीने शासकीय विश्राम गृहच्या आवारात महाराजांच्या स्मृतीना अभिवादन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या तत्पूर्वी छ. शिवरायांच्या पुतळ्याला धरणगाव शहर विकास मंचचे जेष्ठ पदाधिकारी राहुल जैन यांसह उपस्थित मान्यवरांनी माल्यार्पण करीत मानवंदना दिली. तद्नंतर राहुल जैन यांनी मनोगतातून सांगितले की, एक उत्तम शासक, उत्तम लढवय्या, साथीदारांची काळजी घेणारा सहकारी म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर आहे. छ. शिवरायांचे प्रेरणादायी विचार नेहमीच जगण्याची उमेद देतील. आपल्या पराक्रमाने इतिहास घडविणारे छत्रपतींचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्ण अक्षरांनी आजतागायत कोरले गेले आहे आणि ते तसेच कायम राहील. त्यांच्या स्मृतीस मी अभिवादन करीतो असे श्री. जैन यांनी उपस्थितांसमोर सांगितले.
    अभिवादन प्रसंगी शहर विकास मंचचे लक्ष्मणराव पाटील, सुधाकर मोरे, पी डी पाटील, सुनील देशमुख, धर्मराज मोरे, रामकृष्ण धनगर, ललित मराठे, गोपाल पाटील, गोरख देशमुख, वैभव पाटील, प्रथम सूर्यवंशी, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, प्रफुल पवार, गौरव चव्हाण, प्रथमेश पवार, एकनाथ चित्ते, राहुल माळी, राहुल पाटील, अविनाश बाविस्कर, राजेंद्र वाघ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.