यवतमाळ येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा कार्यकारीणीचे गठण भ्रष्टाचार मुक्त करुन गरीबांसाठी कार्य करा – प्रदेशाध्यक्ष राहुल गंगावणे

185

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 5 एप्रिल) यवतमाळ येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा (दिल्ली) द्वारा यवतमाळ जिल्हा भ्रष्टाचार विरोधी मोर्चा कार्यकारीणीचे गठण दि.04 एप्रिल रोजी यवतमाळ येथे करण्यात आले.

याप्रसंगी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलजी गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी त्यांनी यवतमाळ जिल्हा भ्रष्टाचार मोर्चा कार्यकारीणीचे गठण केले.

याप्रसंगी यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय कदम, जळगाव जिल्हा सचिव गजानन कैथवास, शहर प्रमुख दिलीप मुनेश्वर यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या उपस्थितीत यवतमाळ कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.

कार्याध्यक्ष म्हणून दिनेश बोरेकर, उपाध्यक्ष नितीन गुगीलवार, यवतमाळ शहर प्रमुख राजहंस मेंढे, कोषाध्यक्ष उत्तम घरत, सहकोषाध्यक्ष विजयकुमार कनोजिया, सचिव चेतना गुगीलवार, सहसचिव मोनाताई देवगीरकर, वंदना शिंदे, संपर्क प्रमुख प्रभू चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख अरविंद जाधव यांची नियुक्ती करण्‍यात आली.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष राहुलजी गंगावणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष राहुल गंगावणे यांनी भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र व भ्रष्टाचार मुक्त भारत या संकल्पनेतुन भ्रष्टाचार मुक्त करा, गरीबांसाठी कार्य करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे संचलन नितीन गुगीलवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष विजय कदम यांनी मानले.