मराठा आरक्षणासाठी तरुणाची गळफास लावून आत्महत्या गेवराई तालुक्यातील माटेगाव येथील दुर्दैवी घटना

140

 

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114

मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटला असताना आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी गेवराई तालुक्यातील माटेगाव येथील एका २५ वर्षीय तरुणाने शुक्रवार दि.०५ एप्रिल रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दुर्दैवी घटनमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, आबासाहेब बालासाहेब शिंदे (रा.माटेगाव ता.गेवराई जि.बीड) असे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. आबासाहेब शिंदे याची गेवराई येथे वेल्डिंग व्यवसायाची दुकान आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आबासाहेब शिंदे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की, मी सुशिक्षित बेजार झालो असून मला आरक्षण नसल्यामुळे नौकरी मिळाली नाही. मी कर्जबाजारी झालो आहे. जीवनात नैराश्य आले, मराठा आरक्षणासाठी बांधवांनी लढा दिला. त्याचही सरकारने आम्हाला फसविले आहे. म्हणून मी आरक्षणासाठी आत्महत्या करीत आहे. अशी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या सरकारने अजून किती बळी घेणार आहेत. दरम्यान आत्महत्याची माहिती मिळताच उमापूर पोलीस चौकीचे विनोद सुरवसे, तुकाराम पवळ, अमोल येळे, या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून सदरील घटनेचा पंचनामा केला असून घटनेचा पुढील तपास उमापूर पोलीस करत आहेत.