म्हसवड मध्ये जयंतीदिनी महामानवाला अभिवादन शहरात भव्य मिरवणूक; अनुयायाची तोबा गर्दी

    204

    सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा.9075686100

     

    म्हसवड : म्हसवड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३वी जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे रात्री 12 वाजता फटाके वाजवून आणि धम्म वंदना घेऊन बाबासाहेबांचा जयघोष करणेत आला.
    सकाळी नऊ वाजतां ध्वज वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली बौद्धाचार्य कुमार सरतापे यांनी बुद्ध वंदना घेऊन सर्वांनां पंचशील आणि त्रिशरण दिले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हजारोंनी अभिवादन केले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही याठिकाणी भेट देऊन महामानवाला वंदन केले.

    म्हसवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनला आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले. शिवाय ठिकठिकाणी शहरात स्वागत कमानी, निळे झेंडेही लावण्यात आले होते. शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक, वैचारिक तसेच समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले. तसेच भव्य मिरवणुकांचेही आयोजन करण्यात आले होते.
    सायं.6 वाजतां बुद्ध विहारापासुन मिरवणूकीस सुरुवात झाली भव्य मिरवणुकीत हजारोंचा सहभाग होता
    या मिरवणुकीत हजारो बांधव सहभागी झाले होते.मिरवणूक माळी गल्ली, चांदणी चौक बसस्थानकमार्गे ही मिरवणूक महात्मा फुले चौकातून छ. शिवाजी महाराज चौकाकडे व तेथून मुख्य बाजारपेठेकडे मार्गस्थ झाली.

    यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणेसाठी माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे, माजी नगरसेवक शिवाजी लोखंडे, वंचित जिल्हा युवक अध्यक्ष सनी तुपे, माजी नगरआध्यक्ष नितीन दोशी आदी मान्यवरानी अभिवादन केले.
    मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या जयघोषने म्हसवड शहर दुमदूमले तरुणाई डी जे च्या तालावर थीरकली, भीमगीतावरील नृत्य मुलींचा आणि मुलांचा लेझिम चा कार्यक्रम अश्या विविध कार्यक्रमानी मिरवणूकीची शोभा वाढत होती.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सल्लाउद्दीन काझी, मयूर भोकरे या आंबेडकर प्रेमिनी मिरवणूकीतील अनुयायाणसाठी थंड पाणी उसाचा रस याचे मोफत वाटप करण्यात आले.