उमरखेड येथे भीम जयंती निमित्त मोटरसायकल रॅली संपन्न

35

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 15 एप्रिल) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेडकरवादी आणि संविधान प्रेमी तरुणांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मोटरसायकलचे आयोजन करण्यात आले होते.

भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली सुरुवात करण्यात आली होती.
या रॅलीच्या उद्घाटक म्हणून प्रणिताताई कांबळे सामाजिक कार्यकर्ते हे होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो,जय भीम चा जयघोष, संविधानाचा विजय असो अशा गर्जना करत सदर रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड तेथील कार्यक्रम पार पाडून संपन्न करण्यात आली….!

चौकट – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राजकीय वातावरणात निर्माण झाल्याने सदर रॅली ला राजकीय स्वरूप प्राप्त होऊ शकते असे आमच्या लक्षात आल्याने आम्ही सदर मोटरसायकल रॅली ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मध्येच संपन्न करण्याचे ठरवले – सिध्दार्थ दिवेकर (आयोजक)

या रॅलीचे आयोजक पत्रकार सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना), शाम धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना, प्रफुल दिवेकर सामाजिक कार्यकर्ते, कुमार केंद्रेकर अध्यक्ष शांतीदूत समिती, सुनील चिंचोलकर जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना, पत्रकार संदेश कांबळे,पत्रकार बबलू भालेराव, शुद्धोधन दिवेकर शहराध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना,सचिन खंदारे,आकाश श्रवले, अंकुश दिवेकर इत्यादी इत्यादी अनेक समाज बांधवांनी केली होतो.

समाजाचे अनेक समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.