उमरखेड येथे भीम जयंती उत्साहात साजरी… (हजारो आंबेडकरवादी जनसमुदायांनी केले बाबासाहेबांना अभिवादन)

    82

     

    ✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

    उमरखेड (दि. 15 एप्रिल) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील मुख्य वार्ड म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड, उमरखेड येथील सम्यक बुद्ध विहार येथून भव्य दिव्य अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनी मिरवणूक रॅली काढण्यात आली होती.

    या कार्यक्रमाची सुरुवात दि. 11 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले होते.

    तसेच दि. 14 एप्रिल रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.

    त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भंते कीर्ती बोधी,
    आणि नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल (सामाजिक कार्यकर्ते),
    उद्घाटक साहेबराव कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) तसेच प्रणिताताई कांबळे (सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या हस्ते ध्वजारोह करण्यात आले. त्यानंतर लगेच रमामाता महिला मंडळांच्या वतीने ध्वज गीत सादर करण्यात आले.

    त्यानंतर उपस्थित सर्वच मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
    साहेबराव कांबळे यांच्या वतीने वीरेंद्र खंदारे यांनी भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.पंजाबराव नवसागरे, सिद्धार्थ बरडे, हिराबाई दिवेकर, कुमार केंद्रेकर, शंकरराव दिवेकर, विनोद बरडे, बबलू भालेराव, संतोष इंगोले, तुषार पाईकराव इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.

    त्यानंतर सायंकाळी 5 वाजता 133 वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तथा रमामाचा महिला मंडळाच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक रॅली काढण्यात आली.
    सदर रॅली ही आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली.

    या अभिवादन रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी सहभागी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार आपण अभिवादन केले.

    हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उषाताई इंगोले (अध्यक्ष), भारतीताई केंद्रीकर (उपाध्यक्ष),कांचन दिवेकर उज्वला धबाले मधुबाला दिवेकर विद्या इंगोले (सचिव), सुनिता दिवेकर बेबाबाई गवंदे राखी धबाले (कोषाध्यक्ष), स्वाती दिवेकर प्रज्ञा दिवेकर रंजना आठवले (संघटक), कार्याध्यक्ष भारताबाई दिवेकर, मीराबाई दिवेकर,ज्योती हटकर, प्रज्ञा पाईकराव, ममता श्रवले, सुमनबाई पाईकराव, संघमित्रा केंद्रेकर, ज्योती श्रवले, अल्का दिवेकर इत्यादी सर्व रमामाता महिला मंडळांनी परिश्रम घेतले आहे.