विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे साजरी

96

चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातिल मुख्य रस्त्याने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध, यांच्या प्रतिमांसह मिरवणूक (रॅली) काढण्यात आली. जय भीम चा जयघोष करत डीजे च्या तालावर थिरकत विहाराचे प्रांगणात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. जगदीश आनंदराव रामटेके(अध्यक्ष, बौध्द पंच कमेटी) व प्रमुख पाहुणे ग्रा. पं. मालेवाडा सरपंच कालिदास भोयर, उपसरपंच शंकर दडमल, ग्रा.पं.सदस्य प्रमोद जीवतोडे, पोलिस पाटील हेमंतकुमार गजभिये, ज्येष्ठ मार्गदर्शक आयु. डुडारामजी शेंडे, काशिनाथजी गजभिये, नथूजी मेश्राम, चरणदासजी पोईनकर व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करत असताना योगेश मेश्राम म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामगिरीच्या विळख्यात अडकून कोमिजुन गेलेल्या मनामनांतून समाज क्रांतीची मशाल चेतवून समाजाला आपल्या हक्क-अधिकरा प्रती जागृत केले, ते मिळवून दिले, एव्हढेच नव्हे तर ते अबाधित ठेवण्याकरिता संविधानाचे अस्त्र दिले.
भीम जयंती वर्षातून एक दिवस नाचून साजरी करतो, यात काही गैर नाही मात्र वर्षाच्या 364 दिवसात शिक्षणावर भर देत आपली व समाजाची प्रगती घडवून आणण्यावर लक्ष्य केंद्रित करावे असे विचार आयु. अशीत बांबोडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले. सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या वंदना मेश्राम, रागिणी पाटील, सुनीता शेंडे आणि प्रमुख पाहुण्यांना महापुरुषांचे जीवनचरित्र भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिक रामटेके यांनी केले. व आभार प्रदर्शन निलेश मेश्राम यांनी मानले. सामाजिक सहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, यात तरुणांनी उल्लेखनीय योगदान केल. याप्रसंगी समस्त बौध्दजन तथा गावकरी उपस्थित होते.