शेतकऱ्यांना त्रास दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

21

🔹वरुड प्रमुख निलेश कोहळे

✒️शेखर बडगे(अमरावती, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.4ऑगस्ट):-गणेशपूर येथील बॅंक मॅनेजर पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत होते आणि शेतकऱ्यांना व खातेदारांना त्रास देत होते.. गणेशपूर,जामठी,सावंगी,एकदरा,बेसखेडा,आमपेंड,एकलविर, लिंगा,मोहाळ,अशी छोटी मोठी गावे त्या गणेशपूर येथील बॅंकेच्या अंतर्गत येतात (अट्याच) आहे व तेथील स्थानिक बॅंकेचे मॅसेजर व कर्मचारी..शेतकऱ्यांशी व्यवस्थीत रीत्या बोलत सुद्धा नाही कर्ज माफी विषयी माहीती विचारल्यास पिक कर्जा विषयी उडवा उडवीचे उत्तरे देत होते व तुमच्या कडून जे होते ते करुन घ्या अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करुन शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना. त्रास देत होते..त्या नंतर स्थानिक रहिवाशांनी व शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाप्रमुख निलेश कोहळे यांच्या कडे धाव घेतली असता..त्यांनी बॅंक मॅनेजरला चांगलेच वटनीवर आणले आणि ठनकावून सांगितले की तुम्ही आमचे नौकर आहात आणि आम्ही मालक आहो या पूठे जर का शेतकऱ्यांना व खातेदारांना गावातील अशिक्षित गरीब जनतेला त्रास देन्याचा प्रयत्न केला तर बॅंकेला कुलुप लावण्यात येईल… आणि त्याच वेळी अनेक शेतकऱ्यांना कर्जास मंजुरी मिळाली व ज्याचे पैसे बॅंकेने खात्यात जमा झाले असता कापले ते परत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले.. आणि बॅंकेचे मॅसेजर साहेब पिक कर्ज देण्यास तयार झाले. त्यावेळी उपस्थित पुसला सर्कल प्रमुख कपील परीहार, रत्नाकर निमजे,सतिश परीहार ,रामराज चोपडे, कृष्णा धुर्वे, कैलास बोबाडे ,निरज धोंडी , महेंद्रभाऊ तुपकर ,उमेश बेंन्डे , आणि उपस्थित सर्व शेतकरी कष्टकरी बांधव होते व *युवा तालुकाप्रमुख निलेश कोहळे यांनी न्याय मिळवून दिल्या बद्दल त्यांचे सर्व शेतकऱ्यांनी आभार मानले